Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

बुधवार, १४ ऑगस्ट, २०२४

महावितरण बारामती परिमंडलाचे मुख्य अभियंता पदी अंकुश नाळे यांनी पदभार स्वीकारला.


 

इंदापूर तालुका...... प्रतिनिधी एस. बी. तांबोळी, मोबाईल-8378081147

--- महावितरण बारामती परिमंडलाचे सातवे मुख्य अभियंता म्हणून अंकुश नाळे यांनी नुकताच पदभार स्वीकारला आहे. याआधी पुणे प्रादेशिक संचालक म्हणून कार्यरत होते. साडेचार वर्षे पुणे प्रादेशिक संचालकपदाचा अतिरिक्त कार्यभार सांभाळणारे नाळे महावितरणच्या सेवेत २००९ साली अधीक्षक अभियंता पदावर दाखल झाले. त्यांनी अधीक्षक अभियंता म्हणून प्रकाशगड व रास्ता पेठ मंडल कार्यालयात काम केले आहे. तसेच मुख्य अभियंता म्हणून चंद्रपूर परिमंडलाचे व प्रकाशगड येथे विविध विभागांचे काम पाहिले आहे. याशिवाय प्रकाशगड येथे कार्यकारी संचालक (वितरण) व कल्याण येथे प्रादेशिक विभागात असताना कोकण प्रादेशिक सहव्यवस्थापकीय संचालकपदाचा अतिरिक्त कार्यभारही नाळे यांनी सांभाळला होता.

    बारामती परिमंडलातील सर्व वर्गवारीतील ग्राहकांना तत्पर सेवा देण्याबरोबरच तक्रारींचे विनाविलंब निवारण करणे, तसेच महावितरणच्या महसूलवाढीसह प्रधानमंत्री सूर्यघर-मोफत वीज योजना, मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना, कुसुम-ब सौरपंप योजना, सुधारित वितरण क्षेत्र योजना (आरडीएसएस) यांसह विविध योजनांना आणखी वेग देण्यात येईल, असे मुख्य अभियंता अंकुश नाळे यांनी सांगितले.

---------------------------

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा