Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

बुधवार, १४ ऑगस्ट, २०२४

*मुंबई येथे" महाविकास आघाडीचा "विजय निश्चितीच्या राज्यस्तरीय मेळाव्याचे आयोजन*


 

इंदापूर तालुका...... प्रतिनिधी एस. बी. तांबोळी, मोबाईल-8378081147

महायुतीचे घटनाबाह्य सरकार सत्तेत आल्यापासून प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर असलेले आपले महाराष्ट्र राज्य हे सध्या लाचार आणि स्वार्थी राजकारणाला बळी पडत आहे. त्याचा त्रास सर्वसामान्य जनतेच्या मनावर दिसत असून महाराष्ट्राच्या सामाजिक, सांस्कृतिक जडणघडणीला तडा गेला आहे. केंद्रातील भाजप NDA सरकार तर्फे महाराष्ट्र विरोधी धोरण अवलंबिले जात असताना दुर्देवाने महायुतीचे सरकार त्यास सहाय्यभूत भूमिका घेत आहे. महायुतीची हि प्रवृत्ती महाराष्ट्राच्या भविष्याच्या दृष्टीने हिताची नाही.

स्वाभिमानी महाराष्ट्राला या महासंकटातून मुक्त करण्यासाठी आणि महाविकास आघाडीचे रयतेचे राज्य पुन्हा आणण्यासाठी शुक्रवार, दि. १६ ऑगस्ट, २०२४ रोजी सकाळी १०.३० वा, षण्मुखानंद सभागृह, सायन (पूर्व), मुंबई - ४०००२२ येथे " महाविकास आघाडीचा मेळावा " आगामी विधानसभा निवडणूक २०२४ मध्ये मोठ्या मताधिक्याने विजय निश्चित करण्यासाठी आयोजित करण्यात आला आहे.

या प्रसंगी

पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष  खा. शरदचंद्रजी पवार  यांच्या समवेत पक्षाचे खासदार, आमदार, पदाधिकारी, कार्यकर्ते, महाविकास आघाडीतील प्रमुख पक्षांचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते याप्रसंगी उपस्थित राहणार आहेत.

तरी आपण महाविकास आघाडीचा भव्य मेळाव्यास वेळेवर उपस्थित रहावे,असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे  प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे आवाहन केले आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा