Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

बुधवार, २८ ऑगस्ट, २०२४

*आक्रमक राजकारणी व महिलांना न्याय मिळवून देणाऱ्या "जयश्री पाटील "यांनाच विधानसभेचे उमेदवारी द्यावी-- कार्यकर्त्यांची मागणी*

 


*सांगली----पञकार*

*इक्बाल बाबासाहेब मुल्ला

स्व. मदनभाऊगटाच्या कार्यकर्त्यांनी एकजुटीने किल्ला लढवत ,ज्याप्रमाणे अपक्ष असणाऱ्या विशाल पाटील यांना "खासदार" केले अगदी त्याप्रमाणे यंदाच्या विधानसभा निवडणुकीत स्व. मदन पाटील यांच्यावर "जीवापाड प्रेम" करणाऱ्या, त्यांच्या कुटुंबासाठी प्रसंगी जीव देणाऱ्या लढवय्या कार्यकर्त्यांनी जयश्री पाटील यांना आमदार करण्याचा "विडा" उचलला आहे. जयश्री पाटील यांनी थेट विधानसभा उमेदवारी जाहीर करत काँग्रेस नेते पृथ्वीराज पाटील यांना जाहीर आव्हान दिले आहे. जयश्री पाटील यांच्या निर्णायक "डावाने" पृथ्वीराज पाटील हें बॅकफूटवर गेल्याचे चित्र दिसत आहे . 

विधानसभा निवडणुकीत जर पृथ्वीराज पाटील ,जयश्री पाटील समोरासमोर उभे ठाकले तर भाजपासाठी फार मोठी "सुवर्णसंधी" असणार आहे .


    *जयश्री पाटील यांनाच "तिकीट" का ??*


गत विधानसभेवेळी पृथ्वीराज पाटील यांनी पुढील विधानसभेत थांबण्याचा "शब्द" दिला होता ,तो शब्द पाळून त्यांनी जयश्री वहिनींना पाठिंबा द्यावा असे मदनभाऊ गटाचे कार्यकर्ते सांगत आहेत. महापालिकेच्या 20 नगरसेवकांपैकी 19 नगरसेवकांची "फौज" जयश्रीवाहिनी यांच्यासोबत आहे, यावरून संभाव्य वादळाची कल्पना यायला हवी. त्याशिवाय 50% महिला आरक्षण 2028 ला निश्चित असल्याने आतापासूनच "काँगेस पक्षश्रेष्ठीनी" महिलांना उमेदवारी देण्याचे "सूतोवाच" केले आहे.  

राज्यात महिलांवर होणारे अत्याचार, अन्याय बलात्कार छेडछाड , खुन याला एक "महिला आमदारच" न्याय देऊ शकते, महिलांच्या वेदना महिलांच जाणू शकते , त्यामुळे जयश्री पाटील यांची उमेदवारी आज भक्कम मानली जातं आहे .

त्याशिवाय,मदनभाऊ युवा मंच आणि मदनभाऊ पाटील यांच्याप्रेमापोटी या कुटुंबावर प्रेम करणारा "हजारो" मतदारांच्या बळावर जयश्री पाटील यांचे "भवितव्य" ठरणार आहे.


 *जयश्री पाटील यांना विशाल आणि विश्वजीत यांचा आशीर्वाद ???*


खासदार विशाल पाटील स्वाभिमानाची अपक्ष लढत असताना , करताना,काँग्रेस पक्ष पक्षातून काढून टाकेल निलंबित करेल याची काळजी न करता,तमा न बाळगता ठामपणे - निर्भयपणे आणि पायाला दुखापत झालेली असताना देखील विशाल पाटील यांच्यासाठी 265 सभा घेऊन,पायाला भिंगरी लावून विधानसभा क्षेत्र पिंजून काढणाऱ्या जयश्री पाटील यांच्यासाठी विशाल पाटील आणि त्यांच्या मातोश्री शैलजाभाभी पाटील , माजी खासदार प्रतीक पाटील हेदेखील "अनुकूल" आहेत. त्यांच्याशिवाय काँगेसचे बलाढ्य नेते विश्वजीत कदम यांचीही "सहमती" असल्याचे संकेत प्राप्त होत आहेत. हा ग्रीन सिग्नल मिळाला असल्यामुळे जयश्री पाटील यांचे पारडे जड मानले जाते.

 *पृथ्वीराज पाटील यांचे 5 वर्ष केलेली "पेरणी" व्यर्थ ???*


सांगली जिल्ह्यात गेल्या 10 वर्षात काँगेस जिवंत राहिली. याला कारणीभूत असणारे एकमेव व्यक्तिमत्व म्हणजेच पृथ्वीराज पाटील होय. गेल्या 5 वर्षात विविध आंदोलन/ मोर्चा यांच्यामाध्यमातून अतिशय सक्रिय राहून गलितप्राण काँग्रेस मध्ये "प्राण" फुंकून काँग्रेस चा आवाज बुलंद करण्याचे चोख कामं पृथ्वीराज यांनी केले . काँग्रेस कडून तिकिटासाठी त्यांनाच प्राधान्य मिळेल अशी दाट शक्यता आहे. आज जयश्री पाटील यांच्या आक्रमक राजकारणामुळे पृथ्वीराज पाटील यांनी विधानसभेसाठी केलेली पेरणी ,कार्य वाया तर जाणार नाही ना ?? असा प्रश्न आज उपस्थित होत आहे. जर विधानसभा निवडणुकीत पृथ्वीराज पाटील यांनाच काँग्रेस पक्षाचे" तिकीट" मिळाले तर जयश्री पाटील "बंडखोरी" करणार का ?? 


*. इकबाल बाबासाहेब मुल्ला* 

( *पत्रकार* ) 

संपादक - सांगली वेध,

संपादक - वेध मीडिया न्यूज,सांगली.

*मोबाईल - 8983587160*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा