Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

गुरुवार, १५ ऑगस्ट, २०२४

*मुंबई -दादर येथे पहिला" वडापाव" जन्माला आला १९६६ साली*


 

*विशेष ----प्रतिनिधी*

  *एहसान  मुलाणी*

 *टाइम्स 45 न्युज मराठी*

   *मो--9096 837 451*

दादर स्टेशनजवळच्या एका चाळीमध्ये राहणाऱ्या अशोक वैद्य यांनी आपलं वडे आणि पोहे विकण्याचं दुकान १९६०च्या दरम्यान सुरु केलं. आसपासच्या दुकानातही असेच काही खाण्याचे पदार्थ मिळत होते. १९६६ च्या दरम्यान अशोक वैद्य यांना एक आयडिया सुचली. ही आयडिया एकदम साधी सोप्पी होती. एका पाव आणि त्याच्या मध्यभागी बटाट्यापासून तयार केलेल्या वड्याला ठेवायचं, एवढंच बटाटा आणि वडा यांची ही जोडी काहीच दिवसात एवढी गाजली की इतरांनी त्याची कॉपी करायला सुरुवात केली. इथूनच मुंबईत वडापावचा जन्म झाला जो पुढची अनेक वर्ष मुंबईकरांच्या आणि इथे येणाऱ्या प्रत्येकाच्या जिभेवर रेंगाळणार होता.

१९९८ साली अशोक वैद्य निवर्तले. त्यांच्या नंतर त्यांचा मुलगा नरेंद्र आणि त्यांचे कुटुंबीय मिळून हा वारसा पुढे नेत आहेत. वडापावचा जन्माचं ठिकाण आजही अगदी तसंच आहे, जसं १९६६ साली होतं. अशोक यांना परिस्थितीमुळे शिक्षण घेता आलं नाही पण त्यांच्या पुढच्या पिढीने शिक्षणाबरोबर दुकानही सांभाळलं. चंद्रावर जाणारा पहिला माणूस कोण हे जसं आपल्याला माहित असतं, तसंच वडापाव बनवणारा पहिला माणूस कोण हे देखील माहित असलं पाहिजे. बरोबर  आहे ना मंडळी ?  


*संकलन :- सतीश अलोनी*










.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा