*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो;--9730 867 448
राज्य सरकारची सर्वात मोठी आणि महत्वाकांक्षी योजना असलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे महिलांच्या बँक खात्यात जमा होण्यास आजपासूनच सुरुवात झाली आहे. राज्य सरकारे 17 ऑगस्ट रोजी रक्षाबंधन सणाच्या पार्श्वभूमीवर जुलै व ऑगस्ट या दोन महिन्यांचे 3000 रुपये एकाच दिवशी जमा होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र, आजपासूनच ही रक्कम लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. भाजप आमदार राम सातपुते यांनी ट्विट करुन याबाबत माहिती दिली. तसेच, महिलांच्या बँक खात्यात रक्कम जमा झाल्याचे स्क्रीनशॉटही शेअर केले आहेत. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री सध्या आपल्या भाषणातून या योजनेबाबत जनजागृती करत असून विरोधकांच्या टीकेलाही उत्तर देत आहेत
बहिणींना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा प्रत्यक्षात लाभ मिळायला सुरुवात झाली आहे. 3-4 दिवसांवर येऊन ठेपलेल्या रक्षाबंधनचे पवित्र औचित्य साधून स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला महाराष्ट्रातील बहिणींना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळायला सुरुवात झाली आहे. 31 जुलैपूर्वी अर्ज सादर केलेल्या बहिणींच्या बँक खात्यावर जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्यांच्या लाभाची रक्कम, प्रत्येकी 3000 रुपये वर्ग करण्यात आले आहेत. 31 जुलै नंतर अर्ज सादर केलेल्या बहिणींच्या खात्यावरही लवकरच लाभाची रक्कम जमा करण्यात येणार आहे, असे ट्विट आमदार सातपुते यांनी केले आहे.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा