Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

सोमवार, १२ ऑगस्ट, २०२४

*राज्यात सलोख्याचे वातावरण निर्माण करण्यासाठी "महाविकास आघाडी "ची गरज---जयंत पाटील* *भाजपाच्या मुख्तार कोरबु सहअनेकांनी केला राष्ट्रवादी पक्षात प्रवेश*


 

*टाइम्स 45 न्युज मराठी*

 *मो;--9730 867 448*

राज्यात सुसंस्कृत आणि सलोख्याचे वातावरण करून समाजात एकोपा निर्माण व्हावा म्हणून आपण सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे असून शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात सर्व जाती-धर्मातील मावळे स्वराज्यासाठी लढत होतेआता चे सरकार जाती धर्मात तेढ निर्माण करत आहे ही परिस्थिती बदलण्याची गरज आहे ती फक्त आणि फक्त शरद पवार साहेबच करू शकतात आणि लोकसभेला जनतेने महाविकास आघाडीला साथ दिली हीच साथ आता मतदार जनता विधानसभेला देणार अशी मला खात्री आहे असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील हे शिवस्वराज्य यात्रेनिमित्त अकलूज येथे आले असताना ते बोलत होते

     याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, खासदार -अमोल कोल्हे , खासदार- धैर्यशील मोहिते पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे युवक प्रदेशाध्यक्ष- महेबुब शेख,माळशिरस चे भावी आमदार- उत्तमराव जानकर, सोलापूर जिल्हा परिषद माजी अध्यक्ष- मदनसिंह मोहिते पाटील , फत्तेसिंह माने पाटील, माजी सरपंच- शिवतेजसिंह मोहिते पाटील, अकलूज ग्रामपंचायत चे माजी उपसरपंच पांडुरंग भाऊ देशमुख, आदी मान्यवर पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते



    यावेळी खासदारअमोल कोल्हे आणि खासदार धैर्यशिल मोहीते पाटील यांनी उपस्थित पदाधिकारी वा कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले

  याप्रसंगी भारतीय जनता पार्टी व इतर पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात प्रवेश केला सोलापूर जिल्हा भारतीय जनता पार्टी अल्पसंख्यांक मोर्चा चे जिल्हाध्यक्ष- मुफ्तार भाई कोरबु ,सरचिटणीस लुकमान इनामदार ,जिल्हा उपाध्यक्ष- सलीम बागवान, सामाजिक कार्यकर्ते जुबेर दुरुगकर , अब्दुल भाई सय्यद ,तालुका अध्यक्ष- रशीद भाई मुलाणी,अकलूज अल्पसंख्यांक शहराध्यक्ष हमीद भाई मुलाणी, शकील कोरबू अश्फाक काझी, शाहरुख काझी सलमान दुरुगकर, मुजीब कोरबू, शकील कोरबू मुसाभाई मुलाणी, मोहम्मद हनीफ मोमीन,आरफान बागवान निहाल कोरबु इत्यादीनी वरील मान्यवरांच्या उपस्थितीत आणि माढाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांचे नेतृत्व स्वीकारून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात जाहीर प्रवेश केला



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा