Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शुक्रवार, २३ ऑगस्ट, २०२४

*संधीचे सोने करणारा सिनेआभिनेता म्हणजे "योगेश खिलारे"---प्रा.आबासाहेब देशमुख*

 


टाइम्स 45 न्युज मराठी

 मो;--9730 867 448

अकलूज येथील एका सर्वसामान्य कुटुंबातील " योगेश खिलारे "या शालेय शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्याला शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने विजयसिंह मोहिते पाटील क्रीडा संकुलावर आयोजित एका भव्य दिव्य सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये एका गाण्यांमध्ये भाजी विकणाऱ्या कलाकाराची भूमिका मिळाली होती सदर भूमिका त्याने अत्यंत अत्यंत प्रभावीपणे जीव ओतून पार पाडली व सर्वांचे लक्ष वेधून घेतले व मिळालेल्या संधीच त्याने सोन केले .

त्यावेळी कार्यक्रमास उपस्थित शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष जयसिंह मोहिते पाटील उर्फ बाळदादासाहेबांनी त्याचे सर्वत्र जाहीर कौतुक केले व प्रोत्साहन दिले. त्यामुळे पुढे संस्थेच्या अनेक मोठमोठ्या संस्कृती कार्यक्रमांमधून त्याला वारंवार कलाकार म्हणून सहभागी होण्याची संधी दिली गेली. त्यातूनच प्रेरणा घेऊन कलाक्षेत्रात अभिनय व मेहनतीच्या जोरावर आज त्याने *उत्कृष्ट प्रथम पदार्पण सिनेअभिनेता* हा अत्यंत प्रतिष्ठेचा *59 वा महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार* मिळविला आहे .त्याबद्दल *योगेश खिलारे* याचे हार्दिक अभिनंदन.

आज पर्यंत शिक्षण प्रसारक मंडळाच्या माध्यमातून" सैराट "या चित्रपटात आर्चीची भूमिका साकार करणारी रिंकू राजगुरू, स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेत बहिर्जी नाईकाची भूमिका अत्यंत प्रभावीपणे करून चित्रपटसृष्टीत आपली ओळख निर्माण केलेले चित्रपट कलावंत अजय तपकिरे व सोमनाथ (कांबळे) वैष्णव ,चित्रपट, दूरदर्शन व नाट्य क्षेत्रात दिग्दर्शक म्हणून नावलौकिक प्राप्त केलेले व सध्या मध्यप्रदेश मधील सेंट्रल यूनिवर्सिटी ,सागर येथे नाट्यशास्त्र विभागात सेवेत असलेले प्राध्यापक डॉ. अल्ताफ मुलाणी तसेच शंकरराव मोहिते महाविद्यालयातील सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. विश्वनाथ आवड व डॉ.अपर्णा कुचेकर, प्रा. धीरज गुरव, तसेच महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी सहदेव घोलप, योगीराज भिसे हे नाट्य, दूरदर्शन व चित्रपट दिग्दर्शक म्हणून आज नावारूपाला आले आहेत . या व्यतिरिक्त संस्थेचे अनेक विद्यार्थी दूरदर्शन, चित्रपट व नाट्य क्षेत्रात आज कार्यरत आहेत .या यशाच्या पाठीशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष जयसिंह शंकरराव मोहिते पाटील यांची दूरदृष्टी, प्रोत्साहन व मार्गदर्शन हेच कारणीभूत आहे असे या ठिकाणी आम्ही नम्रपणे नमूद करू इच्छितो.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा