Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शुक्रवार, २३ ऑगस्ट, २०२४

*द्या सुरक्षा*


टाइम्स 45 न्युज मराठी

 मो;--9730 867 448


द्या सुरक्षा


कुकर्म करणाऱ्या राक्षसाची 

जात आणि धर्म पाहू नका रे

कृत्य हे नीच  त्या हैवानाचे श्वापदास ही  लाजवणारे !


द्यावी शिक्षा त्याला अशी 

धडापासून करावे शीर वेगळे

नारीच्या सन्मानासाठी चला एकत्र येऊ भारतीय सगळे !


बिल्कीस च्या गुन्हेगारांना

का मिळाले हार तुरे  

पाठराखन नराधमांची का करिती खुर्चीत बसणारे !


चिमुकल्या  निष्पाप कोवळ्या

बोबडे बोल बोलणाऱ्या

कुस्करून टाकल्या हैवानाने

निरागस कळ्या त्या फुलणाऱ्या


कमी वाटते फाशीची शिक्षा

करावे इतके लाचार की

जगणे नको वाटावे त्याला

तडफडून मागावी मृत्यूची भिक्षा 


कायद्याचा ना धाक राहिला

अत्याचाराचाआलेख वाढला

सुरक्षा द्या बाकी काही नको

जगू द्या लाडक्या बहिणींला  



नूरजहाँ शेख

गणेशगांव

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा