*विशेष ----प्रतिनिधी*
*एहसान मुलाणी*
*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो--9096 837 451*
उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रातून उजनी धरणात दौंड येथून 7000 क्युसेस चा विसर्ग होत असून त्या मध्ये वाढ होण्याची शक्यता असल्याने भीमा नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा घेण्यात आला असून याबाबत उजनी धरण व्यवस्थापन कार्यकारी अभियंता भिमानगर यांनी सोलापूर आणि पुणे जिल्हाधिकाऱ्यांना एका प्रसिद्धी पत्रका द्वारे कळविण्यात आले आहे
उपरोक्त विषयान्वये सादर करण्यात येते की, उजनी धरणात आज दि. २४/०८/२०२४ रोजी सायंकाळी ०६:०० वाजता उपयुक्त पाणीसाठा १०६.०४% इतका झाला आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस चालु असुन दौंड येथे ७००० क्यूसेक्स इतका विसर्ग असून त्यामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. त्यानुषंगाने उपयुक्त पाणी साठ्यामध्ये लवकरच मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता असल्याने दि. २४/०८/२०२४ रोजी सांयकाळी ८:०० वाजता उजनी धरणाच्या सांडव्यावरुन भीमा नदीमध्ये पूर नियंत्रणासाठी ४०००० क्यूसेक्स वरून ५०००० क्यूसेक्स इतका विसर्ग वाढविण्यात येत आहे. नदीतील एकूण विसर्ग सांडवा ५०००० क्यूसेक्स व विदयुत गृह १६०० क्यूसेक्स असा एकूण ५१६०० क्यूसेक्स विसर्ग भीमा नदीमध्ये राहणार आहे. तसेच पावसाच्या प्रमाणानुसार व धरणामध्ये येणाऱ्या पाण्याच्या आवक (inflow) नुसार विसर्ग कमी जास्त होण्याची शक्यता आहे.
तरी नदी काठांवरील गावांना व नागरिकांना आपले स्तरावरून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
माहितीसाठी व पुढील कार्यवाहीसाठी सादर.
कार्यकारी अभियंता उजनी धरण व्यवस्थापन विभाग भीमानगर
प्रत मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, सोलापूर/पुणे यांना माहितीसाठी व आवश्यक कार्यवाहीसाठी सविनय सादर.
मा. पोलीस अधीक्षक (ग्रामीण), सोलापूर/पुणे यांना माहितीसाठी व आवश्यक कार्यवाहीसाठी सविनय सादर. मा. अधीक्षक अभियंता व प्रशासक, लाभक्षेत्र विकास प्राधिकरण, सोलापूर यांना माहितीसाठी व आवश्यक कार्यवाहीसाठी सविनय सादर.
प्रत - कार्यकारी अभियंता, भीमा पाटबंधारे विभाग, पंढरपूर / भीमा विकास विभाग क्र. २. सोलापूर यांना माहितीसाठी व आवश्यक कार्यवाहीसाठी सस्नेह अग्रेषित.
प्रत मा. जिल्हा माहिती अधिकारी, सोलापूर/पुणे/अहमदनगर यांना माहितीसाठी व प्रसिद्धीसाठी सादर.





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा