विशेष ----प्रतिनिधी
एहसान मुलाणी
टाइम्स 45 न्युज मराठी
मो--9096 837 451
पुणे जिल्ह्यातील पौड भागात हेलिकॉप्टर कोसळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हे हेलिकॉप्टर मुंबईवरून हैद्राबादला जात असल्याची माहिती समोर आली आहे. हेलिकॉप्टरमधले लोक सुखरूप आहेत. या अपघातात हेलिकाँप्टरचा कँप्टन जखमी झाला असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यात सकाळपासूनच पावसाला सुरुवात झाली आहे. शहरात संततधार तर ग्रामीण भागात मुसळधार पाऊस पडत आहे. सर्वत्र ढगाळ वातावरण आहे. काही भागात वादळी वाऱ्यासह पाऊस पडत आहे. अशातच पुण्यातील पौड भागात पावसाचा जोर कायम असल्याने हेलिकॉप्टर कोसळल्याची प्राथमिक माहिती समोर आली. अपघाताचे तांत्रिक कारण अद्याप कळू शकले नाही. हेलिकॉप्टरमध्ये कॅप्टन आनंद, दिर भाटिया, अमरदीप सिंग एस पी राम हे चार जण प्रवास करत होते. त्यापैकी तिघांची प्रकृती स्थिर असून कॅप्टन आनंद यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा