Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शुक्रवार, १६ ऑगस्ट, २०२४

*अकलूज येथील जिल्हा परिषद मुली शाळा नं.१ येथे स्वातंत्र्य स्वातंत्र्य दिना निमित्त ध्वजारोहण संपन्न*


 

*विशेष ----प्रतिनिधी*

  *एहसान  मुलाणी*

 *टाइम्स 45 न्युज मराठी*

   *मो--9096 837 451*

*अकलुज  येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुली नंबर 1 या शाळेत भारताचा 78 वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा-"अमृता सदाफुले" यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेच्या मुख्याध्यापिका उमा जाधव यांनी केले. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्य दिन तसेच थोर क्रांतिकारकांविषयी आपले विचार व्यक्त केले.कवायत व सांस्कृतिक कार्यक्रम साजरा करण्यात आले. शिक्षण सप्ताह कार्यक्रमांतर्गत स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांना बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी उपाध्यक्ष महादेव स्वामी,सदस्य चंदन कोतमिरे, पालक सदस्य लक्ष्मण सदाफुले तसेच माता पालक व शिक्षक पालक सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष यादव व आभार उमेश फलटणकर यांनी मानले.कार्यक्रम यशस्वी पार करणेसाठी उज्वला भोसले व शाळेतील सर्व शिक्षकांनी परिश्रम घेतले.*





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा