Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शुक्रवार, १६ ऑगस्ट, २०२४

*कष्टासमोर यशाला नतमस्तक करायला लावणारे सांगलीचे लोहपुरुष-- म्हणजे, " राज पन्हाळकर"*


 

*विशेष ----प्रतिनिधी*

  *एहसान  मुलाणी*

 *टाइम्स 45 न्युज मराठी*

   *मो--9096 837 451*

लोखंडाला पराजित करणाऱ्या,आणि यशावर आरूढ होऊन,त्यावर "अधिराज्य" गाजविणाऱ्या व्यक्तीला लोहपुरुष म्हणतात ! सांगलीत देखील अशीच एक व्यक्ती आहे, ज्यांनी लोखंडाचा व्यवसाय करत ,अपयशाचे अनेक "घाव" झेलत , पराजयाचे अनेक दिवस पाहिले. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत सुखदुःखाची सोबती असणाऱ्या पत्नी बीबीजान यांच्या प्रखर "ऊर्जास्रोतच्या" सानिध्यात आज व्यवसायात प्रचंड यशस्वी झालेल्या या व्यक्तीचे नावं आहे "राज पन्हाळकर" !

वयाच्या 13 व्या वर्षी राज यांनी व्यवसायिक सुरवात केली. ज्याप्रमाणे लाव्हारसात तत्प होऊन ज्याप्रमाणे लोखंड "यथोचित" रूप धारण करते ,अगदी त्याप्रमाणे लहान वयात वडिलांच्या कारखान्यात प्रशिक्षित कामगारांच्या माध्यमातून काम करण्याचे धडे गिरवत, 2 वर्षात एक निष्णांत मेस्त्री प्रमाणे राज पन्हाळकर हे कामं शिकले. काही वर्षानी लग्न झाल्यावर वेगळी "चूल" मांडावी लागली.व पुन्हा एकदा श्रीगणेशा करावा लागला. परमेश्वरदेखील "लायक" व्यक्तीचीच परीक्षा घेतो असे वाटते.कारण उदरनिर्वाह चालावा म्हणून विविध वस्तू विकण्याचा व्यवसाय करत करत ,रिक्षा चालवून "आर्थिक" घडी बसविण्याचा प्रयत्न त्यांनी केला.परंतु प्रत्येक वेळी अपयश "दबा" धरत त्यांच्या आनंदावर "विरजण" घालत होते. 

सलीम आणि सर्फराज ही मुले लहान होती. कुटुंबाचे आर्थिक "खच्चीकरण" होऊ द्यायचे नाही या इर्षेने राज पन्हाळकर यांनी पुन्हा एकदा पारंपरिक असणारा ट्रॅक मार्ट अर्थात पत्र्यापासून वस्तू तयार करण्याच्या कामाचा शुभारंभ केला. घरात पत्र्याची पेटी,लोखंडी कॉट, रॅक आदी वस्तू घेऊन ते होलसेल व्यापाऱ्यांना देण्याचा प्रयत्न करू लागले. उच्च दर्जा आणि "प्रामाणिकपणा" यामुळे सांगली मध्ये थोडा जम बसू लागला. सांगली मधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळील पोस्ट ऑफिस संध्याकाळी 6 वाजता बंद झाल्यावर आपले दुकान तेथेच थाटले. उत्कृष्ठ माल आणि विनम्र सेवा यामुळे ग्राहक पुन्हा - पुन्हा येऊ लागले. पैशाची चणचण असताना देखील नवनवीन "कल्पना" वापरण्याचा त्यांचा निश्चय होता.त्याप्रमाणे रस्त्यावरील सिगरेटची मोकळी पाकिटे शोधून त्या कागदावर त्यांच्या मालाची किंमत आणि त्यांचा पत्ता लिहिण्याचा त्यांचा निर्णय त्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारा ठरला .कारण कारखान्याचा संपूर्ण पत्ता कोणाला माहित नव्हता.पत्ता मिळाल्याने ग्राहकांमध्ये कमालीची वाढ झाली. आणि त्यातून कुटुंबासाठी सर्वोत्कृष्ठ द्यायचे या जिद्दीतून त्यांनी आपला माल वेगवेगळ्या गावात, जत्रेत नेण्याचा निर्णय घेतला. प्रत्येक जत्रेमध्ये त्यांचा माल हातोहात खपू लागला. त्यामुळे राज यांनी मायाक्का चिंचणी येथे तब्बल 1 महिना थांबून माल विक्री करण्याचा विचार केला. त्यांची सहचारिणी बीबीजान यांनी राज यांना पाऊलोपाउली समर्थ साथ देत आपले कर्तव्य निभावले. चिंचणी मध्ये "एक लाख" रुपयांचा व्यवसाय होत असल्याने त्यांनी आपल्या व्यवसायासाठी नवीन जागा शोधली. 4 लाख रुपयांना आणि तेही टप्याटप्यात पैसे देऊन त्यांनी आज असलेली राम नगर गल्ली क्रमांक 1 रोडवर बी.राज ट्रेंक मार्ट साठी जागा विकत घेतली. सांगली जिल्ह्यात भाड्याने टेम्पोतुन माल "परजिल्ह्यात" विकण्याचा त्यांचा निर्णय फलदायी ठरला होता. आणि शून्यातून विश्व निर्माण करणे ही रूढ असणारी म्हण -सुविचार राज पन्हाळकर यांच्या आयुष्यात अक्षरशः लागू ठरली.

जेंव्हा व्यवसाय "तोट्यात" चालायचा, रिक्षा कपडे ,आणि इतर कामे करताना,रिक्षातून जाताना "गणपती पेठ" येथे दत्त ट्रँक मार्ट हें भव्य दुकान आणि दुकानाचा बोर्ड पहिला तेंव्हाच राज यांनी स्वतःच्या कारखान्याचे नावं राज ट्रँक मार्ट हें ठेवण्याचा निर्णय घेतला होता.परंतु प्रारंभी हें नावं ठेवल्यावर "यश" त्यांना सतत हुलकावणी देत होते,त्यांना *अपयश* येत होते. त्यांनी पुष्कळ प्रयत्न केला परंतु पैसा आणि यश दूर जातं होते. तेंव्हा त्यांनी सुख -दुःखात सहभागी असणाऱ्या त्यांची अर्धांगिनी असणाऱ्या बीबीजान यांचे पहिले अक्षर असणारे- बी- हे नावं वर्कशॉप ला देण्याचे ठरवले. बी.राज ट्रँक मार्ट हें नवीन नावं वर्कशॉप ला दिले गेले. परमेश्वराच्या कृपने जादूची कांडी फिरावी त्याप्रमाणे राज यांच्यावर "पैशाचा पाऊस" पडू लागला. ज्यात हात घालाल त्याचे "सोने" होऊ लागले.आणि राज पन्हाळकर कालांतराने एक प्रतिष्ठित उद्योगपती बनले. त्यानंतर राज यांनी नवीन चारचाकी गाडी विकत घेतली,ती ही पत्नीच्या नावे , त्यानंतर नवीन बंगला घेतला ,तोही पत्नी च्या नावानेच पत्नी त्यांच्यासाठी लकी होत्या हें कालांतराने सिद्ध झाले.

2019 मध्ये कोरोना काळात मार्केटची आर्थिक परिस्थिती कोसळली होती.तेंव्हा चारचाकी गाडी खरेदी - विक्रीच्या व्यवसायात त्यांनी पदार्पण केले. आज 2024 पर्यंत शेकडो गाड्यांचे व्यवहार करत या व्यवसायात देखील प्रगती केली. वयाच्या 65 व्या वर्षी देखील एका तरुणाला लाजवेल अशी कामे ते करतात. मिनरल वॉटरचा व्यवसाय, गाड्या खरेदी -विक्री आणि बी.राज ट्रँक मार्ट या फर्म च्या माध्यमातून सांगलीकरांच्या विश्वासाला ते पात्र ठरत आहेत. सामाजिक कार्यकर्ते सलीम पन्हाळकर ,आणि सर्फराज पन्हाळकर यांच्या माध्यमातून राज हे व्यवसायाला यशोशिखरावर घेऊन जातं आहेत. कित्येक वर्षांपासून राज पन्हाळकर यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचा जीवनप्रवास उलगडण्याचा निश्चय मी केला होता. सुदैवाने आज तो "योग" आला. 

माझे जिवलग मित्र "सलीम पन्हाळकर" यांचे वडील राज पन्हाळकर यांचा आज वाढदिवस आहे. त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ! 


*इकबाल बाबासाहेब मुल्ला* 

( *पत्रकार* ) 

संपादक - सांगली वेध ,

संपादक - वेध मीडिया न्यूज,सांगली .

*मोबाईल - 8983587160*



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा