*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो.9730 867 448
नागठाणे येथील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा नागठाणे येथे यशस्वी विद्यार्थ्यांचा गुण गौरव सोहळा नुकताच उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमात विविध स्पर्धा परीक्षा मध्ये प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा गुण गौरव केला.व या सोहळ्यामध्ये सराफ असोसिएशन नागठाणे यांच्या मार्फत विद्यार्थ्यांना पारितोषिक वितरण करण्यात आली.अश्या शुभेच्छा सदर समारंभासाठी सराफ असोसिएशनेतील सभासदांनी दिल्यात.
याप्रसंगी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सदस्य तसेच सराफ असोसिएशनचे अध्यक्ष ,सभासद तसेच शाळेचे मुख्याध्यापिका सौ. जाधव मॅडम व आदींच्या हस्ते विद्यार्थ्यांना विविध बक्षीस वाटप करण्यात आले. यावेळी शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमास विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा