*श्रीपूर---ज्येष्ठ पञकार*
*बी.टी.शिवशरण
हल्ली आरक्षणाचा मुद्दा खूपच चर्चेत आला आहे व या आरक्षणाच्या विषयाने संपूर्ण देश ढवळून निघाला आहे केंद्र शासनाने हा विषय त्यांच्या पटलावर घेऊन हा विषय कायमचा संपवून टाकण्यासाठी व देशातील गरीबी मागासलेपण घालवण्यासाठी या देशातील जमीनीचे समान वाटप करुन इथल्या सर्व भूमी पुत्र असलेल्या अठरापगड जातींना मागासवर्गीय समाजातील घटकांना किमान दहा एकर जमीन देण्याचा कायदा पारित करावा व आरक्षणाचे लाचारीचे तुकडे ज्यांना पाहिजे आहेत त्यांना टाकावेत ज्यांच्या शेकडो पिढ्यांनी या देशाच्या मातीशी इमान राखून अपार कष्ट रक्त ओकणारे कष्टमय जीवन व्यतीत केले दुसर्याच्या शेतात सालगडी म्हणून आयुष्य वेचले या देशातील दलित उपेक्षित वंचित दुर्लक्षित घटकांना ओबीसी समाजाला अपमानास्पद जिणे वाट्याला आले या देशात जन्माला येऊन गुन्हा केला का हा सवाल दलित विचारत आहेत ज्यांना रहाण्यासाठी एक गुंठा जमीन नावावर नाही सात बारा उतारावर नाव नाही दोन वेळच्या जेवणासाठी भटकंती करावी लागते मुलाबाळांना शिक्षणासाठी कायमस्वरूपी ठिकाण नाही अशा समाजाने वाळीत टाकलेल्या व त्यांच्या कष्टावर आपल्या जमीनीचे मळे फुलवले इमले माडया बांधल्या ऐषोराम जिवनात आनंद सर्व सुखसुविधा यांचा भोग घेतला त्याच वंचित बहुजन मागासवर्गीय समाजाला आर्थिक समानतेच्या एका रेषेत आणण्यासाठी संविधानाने आरक्षण व सवलती दिल्या आहेत त्या दिल्या म्हणजे त्यांच्यावर उपकार केले नाहीत या देशातील मातीशी संस्कृती व इतिहास आणि परंपरा यांचा संबंध आहे या मागासवर्गीय समाजाला दोन वेळच्या जेवणासाठी आयुष्य पणाला लावावं लागलं कष्ट कष्ट यांच्या पलीकडे यांना काहीही पदरात पडलेले नाही आणि आरक्षणाच्या कुबड्या घेऊन आता कुठं हळूहळू हा उपेक्षित वंचित मागासवर्गीय समाज वाटचाल करु पहात आहे पण आता नव्याने सधन धनदांडगा घटक असलेल्या समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण मागणीचा मुद्दा जोर धरत आहे त्यांनी त्यांना स्वतंत्र व वेगळं आरक्षण किती पाहिजे ते सरकार कडून घ्यावे त्यांना मागासवर्गीय समाजांचा विरोध असण्याचे कारण नाही या समाजाला किमान अडीच एकर पाच एकर दहा एकर व पन्नास शंभर दोनशे एकर जमीनी आहेत दुसरीकडे भटके विमुक्त समाजातील लोकांना स्वतःची झोपडी टाकण्यासाठी अर्धा गुंठा जमीन नाही केवढा हा विरोधाभास भिख मागून जगणारे पोटासाठी वणवण करुन जीवन जगणारे गरीबांच्या ताटातील भाकरी मागण म्हणजे आधीच अर्धपोटी उपाशी व निराधार अशांचे पोटावर पाय देऊन हक्क मागणी करणे याला काय म्हणावे यासाठी केंद्र शासनाने या देशातील सर्व जमीनीचे समान वाटप करुन सरसकट सर्वांना दहा एकर जमीन देण्यात यावी व त्या नंतर ज्यांना त्यांच्या समाजातील लेकरा बाळांना आरक्षण पाहिजे ते द्यावे आता पर्यंत गावगाडा स्थानिक स्वराज्य संस्था तालुक्यातील राजकारण जिल्ह्यातील राजकारण व राज्यपातळीवर असलेले राजकारण सत्ताकारण हे या सधन वर्गातील नेतृत्वाने केले आहे सत्ताच त्यांच्या हातात आहे त्यामुळे आरक्षणाची लाचारी कुणाला करायची आहे सर्व मागासवर्गीय घटकांना जगण्यासाठी उदरनिर्वाहासाठी किमान दहा एकर जमीन देण्यात यावी मग आम्ही या आरक्षणावरील हक्क सोडून देऊ शेकडो एकर जमीन असलेल्या सधन धनदांडगे नेतृत्वाने बाई बाटली ताटली यात त्यांच्या काही एकर जमीनी विकुन टाकलेल्या आहेत त्यात मागासवर्गीय समाजांचा काय दोष आहे मागासलेपण लाचारीचे अपमानास्पद जिणे व अस्पृश्य म्हणून हीन जीवन जगणे हे कुणाला भूषण वाटते ज्यांना या मागासलेपण जातीत यायची इच्छा आहे त्यांनी जरूर मागासलेपण स्विकारावे त्या बदल्यात मात्र देशातील संपूर्ण जमीनीचे समान वाटप करण्याची तयारी ठेवावी
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा