*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो.9730 867 448
तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग येथील तुळजाभवानी सहकारी साखर कारखान्याने कर्मचाऱ्यांची उपदानाची (ग्रॅज्युटीची) रक्कम न दिल्याने कर्मचाऱ्यांनी लातूर येथील कामगार न्यायालयात याचिका दाखल केली असून अगोदरच शेतकऱ्यांचे पैसे न दिलेले अडचणीत सापडलेला कारखान्याच्या अडचणीत अजून वाढ झाली आहे श्री तुळजाभवानी सहकारी साखर कारखान्याचे अनेक कर्मचाऱ्यांची उपदानाची रक्कम कारखान्याकडे येणे आहे याबाबत कर्मचाऱ्यांनी वारंवार कारखाना प्रशासनाकडे मागणी करून सुद्धा अद्याप पर्यंत कर्मचाऱ्यांना कोणतीही रक्कम देण्यात आलेली नाही अनेक कर्मचाऱ्यांची आयुष्यभराची कमाई कारखान्याकडे अडकून पडल्याने कर्मचाऱ्यांची आर्थिक कोंडी होत आहे मात्र कारखान्याने कर्मचाऱ्यांना कोणतीही दाद न दिल्याने कर्मचाऱ्यांनी आता कामगार न्यायालय धाव घेतली असून एडवोकेट दिलीप मराठे यांच्या मार्फत जवळपास दोनशे कर्मचाऱ्यांची याचिका दाखल करण्यात आली असून आणखीन काही कर्मचाऱ्यांची याचिका दाखल करण्यात येणार असल्याची माहिती इंटर कामगार युनियनचे उपाध्यक्ष साहेबराव भिसे कोषाध्यक्ष नारायण शिंदे सहकोषाध्यक्ष बापूसाहेब गाटे सदस्य अरुण पाटील मारुती कवडे यांनी दिली आहे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा