सांगली-----पञकार
इक्बाल बाबासाहेब मुल्ला
मो;--8983 597 160
सावधान :,
एखाद्या चौकात किंवा रस्त्यावर तुम्ही चारचाकी "पार्क" केला आहात आणि काही वेळानंतर तुम्ही तुमच्या *गाडीजवळ जाऊन गाडीला किल्ली लावून आत जाणार तोपर्यंत चार - पाच लोक तुमच्याकडे येतात, आणि गाडीची किल्ली काढून घेतात.त्यातील एक व्यक्ती कागदपत्र असणारी एक फाईल उघडतो,आणि गाडी नंबर असणारी 4 व्हीलर हिच ..आणि चारचाकी गाडीच्या मालकाचे नावं म्हणजेच तुमचे नावं , जे असेल ते वाचून दाखवतो. या गाडीवर एका *फायनान्स कंपनीचे कर्ज आहे. 50000 किंवा 1 लाख ..जे तोंडात येईल तो आकडा तुम्हाला सांगितला जातो. तुझ्यासाठी गेले 1 महिना आम्ही फिरत आहोत.पण तू आम्हाला गुंगारा देत होतास. आज कंपनीच्या तावडीत सापडलास असे त्या टोळीकडून सांगितले जाते.
4 - 5 लोकांच्या आक्रमक प्रश्नाने समोरचा चारचाकी मालक थबकतो.व भांभावून जातो. कारण सेकंडहॅन्ड कार असेल आणि त्यावर कर्ज असेल या भीतीने चारचाकी धारक घाबरतो आणि तेवढ्यात ते 4-5 लोक गाडीचा दरवाजा उघडून गाडीच्या आत बसतात.आणि कोणत्याही कंपनीचे नावं सांगून उद्या कंपनीत या ..पैसे भरा आणि गाडी घेऊन जा ..असे सांगतात. चारचाकी मालक त्यांना समजावून सांगण्याआधी ते भामटे पसार झालेले असतात.
फसवणूक कशी होते ते पहा. मोबाईल मध्ये गाड्यांचे नंबर टाकताच गाडीच्या मालकाचे नावं येते. सर्व डाटा येतो. भामटे याचाच गैरवापर करतात.आणि गाडी हेरून त्या गाडीची माहिती क्षणार्धात काढतात . आणि एका कागदावर लिहितात. आणि चारचाकी मालक गाडीजवळ येताच वरीलप्रमाणे सर्व "ड्रामा" केला जातो. वास्तविक कोणीही तुमच्या गाडीजवळ आल्यावर आणि फायनान्स कंपनी आणि हफ्ते याबद्दल सांगताच ,तुम्ही जवळील पोलीस स्टेशनचे नावं किंवा "प्रशासकीय कर्मचारी" असल्याचे सांगितले पाहिजे. आणि क्षणार्धात आरडाओरड केली पाहिजे . किंवा जवळच्या मित्राला फोन करून बोलावले पाहिजे. जेणेकरून ते "चोरटे" घाबरून पळून जाऊ शकतील.जर तुम्हीच शांत बसला तर ते वरचढ होऊन तुम्हालाच गाडीच्या बाहेर ढकलून गाडी घेऊन फरार होतात.
एक तर ती गाडी बोगस कागदपत्र आणि दुसरा रंग देऊन बाजारात तात्काळ विक्रीसाठी आणली जाते .अथवा मुंबई किंवा अन्य शहरात भंगार साठी विकली जाते .
सांगली जिल्ह्यात तसेच महाराष्ट्रात अनेक शहरात असे प्रकार वाढीस लागले आहेत. दादागिरी करणाऱ्या गँगच्या अशा टोळ्या आहेत. पोलिसांनी चाणाक्षपणे चौकशी केली तर सांगली मध्ये अनेक टोळ्या अशाप्रकारे कामं करताना त्यांना आढळतील. पोलिसांनी तडजोड आणि मलई संस्कृतीला रामराम केल्यास निश्चितपणे हा भयानक प्रकार उघडकीस येईल.
आत्तापर्यंत महामार्गावर ( *हायवे* ) च्या ठिकाणी असे प्रकार पाहावयास मिळत होते परंतु आता गाडी चोरीचे लोण शहरापर्यंत येऊन पोहोचले आहे. फायनान्स च्या या टोळ्यांचा यच्छेद धुमाकूळ "भयानक" रूप घेत आहे .
एखादा शांत - सज्जन गृहस्थ हा त्यांचा बकरा असतो. वास्तविक कोणत्याही फायनास कंपनीने अशाप्रकारच्या गाडी जबरदस्तीने ,शिवीगाळ करत आणण्याची सक्ती करत नाही. संध्याकाळी 5 नंतर कोणताही कर्मचारी गाडीमालकाच्या घराजवळ देखील जाऊ शकत नाही. कारण तसे करणे "नियमबाह्य" असते . परंतु जबरदस्तीने ,दादागिरी करत ,शिवीगाळ करत वसुली अधिकारी आहे असे भासवत 4-5 लोक गाडी ची चोरी करत असतील तर तुम्ही सर्व वाचक "सावध" व्हावेत आणि तुमचे आर्थिक नुकसान होऊ नये या उद्दात्त भावनेने सदर लेखाचे प्रयोजन आहे. सावध रहा ,सजग रहा .चौकस रहा .जागरूक रहा ..!
धन्यवाद !
*इकबाल बाबासाहेब मुल्ला*
( *पत्रकार* )
संपादक - सांगली वेध
संपादक - वेध मीडिया न्यूज,
*मोबाईल - 8983587160*





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा