Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

रविवार, ४ ऑगस्ट, २०२४

*सोलापूर येथे "पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या" संपर्क कार्यालयाचे महाराष्ट्र युवक प्रदेशाध्यक्ष- "सोमनाथ भोसले" यांच्या हस्ते उद्घाटन-- नूतन पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर*

 


*टाइम्स 45 न्युज मराठी*

 *मो;--9730 867 448

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीचे औचित्य साधून पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे सोलापूर शहर व जिल्हा संपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले.तत्पूर्वी पीपल्स रिपब्लिकन पक्षाच्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या भैय्या चौक येथील पूर्णाकृती पुतळ्यास अभिवादन करण्यात आले व उपस्थित समाज बांधवांना मिठाई वाटून शुभेच्छा देण्यात आल्या.त्याचबरोबर सायंकाळी पीपल्स रिपब्लिकन पक्षाच्या शहर व जिल्हा संपर्क कार्यालयाचे उद्घाटन सोलापूर शहरातील जुना बोरामनी नाका येथे करण्यात आले.अडचणीच्या प्रसंगी सर्वसामान्य जनतेला पक्षाशी सहज संपर्क साधता यावा आणि पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना पक्षाचे कामकाज करणे सोपे जावे या हेतूने या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आल्याचे यावेळी मनोगत व्यक्त करताना प्रदेश युवक अध्यक्ष सोमनाथ भोसले व जिल्हाध्यक्ष अमित कांबळे यांनी सांगितले.तसेच यावेळी महत्वाच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी पत्र देवून जाहीर करण्यात आले.





यावेळी अल्पसंख्याक जिल्हा अध्यक्ष पदी जाविद बानकरी,शहर युवक अध्यक्ष पदी गोपीचंद तिकोटे,जिल्हा संपर्क प्रमुख पदी महिबुब शेख,शहर संपर्क प्रमुख पदी विकी बनसोडे,अक्कलकोट तालुका युवक अध्यक्ष पदी वाहिद मुस्तफा,जिल्हा मीडिया प्रमुख पदी सद्दाम पठाण,शहर मीडिया प्रमुख पदी राज सोनवणे यांची निवड करण्यात आली.प्रदेश युवक अध्यक्ष सोमनाथ भोसले,जिल्हाध्यक्ष अमित कांबळे,शहर अध्यक्ष शरणू हजारे,जिल्हा युवक अध्यक्ष विश्वजीत सरवदे,ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्रीकांत अण्णा देढे यांच्या हस्ते निवडीचे पत्र देऊन शुभेच्छा देण्यात आले.यावेळी युवा नेते अमित धडे,रफिक बागवान,माळशिरस तालुका अध्यक्ष हेमंत कांबळे,माळशिरस तालुक्याचे युवा नेते तुषारजी केंगार,आकाश भैय्या माटे,अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव अध्यक्ष सचिन गायकवाड,दत्ता क्षीरसागर,राज साबळे,अभिजित कांबळे,विकेश डेढे,गणेश कांबळे,सागर शिंदे,शाम उडानशिवे,पी आर पी नेते रमेश चलवादी,दाऊद होनमुर्गी,जाकीर भाई बिजापुरे,अमिन मिरजकर,इमरान अरब,इमरान शेख,सोहेल सगरी,सोहेल शेख,नवीलाल खरादे,जावेद मुस्तफा,जावेद शेख,अनिल हल्कट्टी,वनराज बंडी मालक, तालु इनामदार,सचिन अनगीरे व बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा