*उपसंपादक -- नूरजहाँ शेख*
*टाइम्स 45 न्युज मराठी*
देशाने आपल्यासाठी काय दिले यापेक्षा आपण देशासाठी काय केले हे पाहणे अत्यंत गरजेचे आहे. असे मत अकलूज येथील सुप्रसिद्ध डॉ रावसाहेब गुळवे यांनी श्री जयसिंह मोहिते- पाटील विद्यालय संग्रामनगर शाळेत आयोजित ७८व्या स्वातंत्र्य दिनाच्या ध्वजारोहण कार्यक्रमाचे वेळी बोलताना मांडले.
यावेळी स्थानिक प्रशाला समिती सदस्य महादेव अंधारे, यशवंत साळुंखे, संग्रामनगर ग्रामपंचायतीचे सरपंच पंकज गाडे, माजी सरपंच कमाल शेख, सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक दळवी साहेब, मुख्याध्यापक मल्हारी घुले, प्राथमिक विभाग मुख्याध्यापक गणेश करडे, पूर्वप्राथमिक विभाग प्रमुख अनिता सुर्यवंशी आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना डॉ. गुळवे म्हणाले की आपल्या देशापुढील ज्या समस्या आहेत मुळासकट त्याचे निवारण करणे गरजेचे आहे. भारतीय शिक्षण पद्धती संस्कारमय असून त्यामुळेच परदेशातील मोठ्या कंपनीतील अधिकारी हे भारतीय आहेत. अजून असेच सुजाण नागरिक आपण घडवले पाहिजेत.
स्थानिक प्रशाला समिती सदस्य महादेव अंधारे यांनी विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या कवायत, सांस्कृतिक कार्यक्रम आणि गुणवंत विद्यार्थी यांचे कौतुक केले.तसेच पालकांच्या सहभागाबद्दल त्यांचे आभार मानले.
सर्वप्रथम ध्वजारोहण आणि ध्वजसलामी देऊन कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर सामुहिक कवायत पार पडली. त्यानंतर अद्विक बनपट्टे, चैतन्य पारसे,ज्ञानेश्वरी उबाळे या विद्यार्थ्यांनी शालाबाह्य स्पर्धा परीक्षा आणि एस.पी.एम चित्रकला स्पर्धेत यश संपादन केल्याबद्दल गुणवंत विद्यार्थी सत्कार करण्यात आले.
प्रशालेतील विद्यार्थी हिंदवी देवशेटे,वेदांत घोडके, ऋताश्री देवशेटे, महेश्वरी उबाळे, सोहम पवार, अद्विक बनपट्टे, सागर नागरगोजे, ज्ञानेश्वरी उबाळे, आनंद बनसोडे, संयोगिता माने यांनी भाषणे केली.
यानंतर पुर्व प्राथमिक विभागाचे ये मेरा इंडिया, प्राथमिक विभागाचे चक दे इंडिया, आणि कुछ करिए, माध्यमिक विभागातून सुनो गौरं से दुनिया वालो, देश रंगीला, तेरा जलवा, फिर भी दिल है हिंदुस्थानी या गीतावर नृत्य सादरीकरण करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक मल्हारी घुले यांनी केले तर सूत्रसंचालन प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक गणेश करडे आणि सहशिक्षक महेश शिंदे यांनी केले. शेवटी सारे जहाँसे अच्छा समुहगीत गायनाने आणि खाऊ वाटपाने कार्यक्रमाची सांगता झाली.
यावेळी विद्यार्थी, पालक, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी, सुरेश माने,संतोष कदम, महेश शिंदे,शैलेश माने,रवींद्र कवटे,सतिश एकतपुरे, नवनाथ राऊत,सुनील काळे शिक्षिका अनिता सुर्यवंशी,
विजया पेटकर,रोहिणी गायकवाड,आरती दोरकर,शुभांगी कदम, वैभवी बोदडे,शीला भूमकर यांनी कष्ट घेतले.






कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा