*विशेष ----प्रतिनिधी*
*एहसान मुलाणी*
*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो--9096 837 451*
कोडोली ( ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर ) / दिनांक -१५ : येथील यशवंत शिक्षणशास्त्र महाविद्यालय ( बी. एड. कॉलेज ) च्या प्रांगणात प्राचार्य डॉ. विश्वनाथ पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. येथील यशवंत उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य पंडित साळोखे यांच्या प्रमुख उपस्थितीत ध्वजारोहण सोहळा पार पडला. यशवंत शिक्षणशास्त्र महाविद्यालय ( बी. एड. कॉलेज ) आणि यशवंत उच्च माध्यमिक विद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने या सोहळ्याचे आयोजन केले होते. यावेळी शिक्षक, प्राध्यापक , शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.
याप्रसंगी यशवंत हायस्कूल व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या खालील शिक्षकांचा शाल - श्रीफळ व वृक्ष देवून प्राचार्य डॉ. विश्वनाथ पाटील , प्रा . अजित लोकरे आणि प्रा. एस. डी. रक्ता डे या मान्यवरांच्या हस्ते गौरव कऱण्यात आला. यशवंत हायस्कूल - इंग्रजी विषयात सेट उत्तीर्ण - जयश्री सुतार. उच्च माध्यमिक विद्यालयात वीस टक्के अनुदानावर नियुक्ती झालेले शिक्षक - शितल जाधव, गीतांजली कांबळे, पौर्णिमा पेटकर अक्षय अवघडे.
प्रा. श्रीमती एस. एस. पाटील यांनी प्रास्ताविक केले. आदिती शिंदे या विद्यार्थिनीने सूत्रसंचलन केले.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा