*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो;--9730 867 448
अकलूज पोलीस ठाणे मध्ये कार्यरत असलेले पोलीस हवालदार सोमनाथ हरीभाऊ कोळी यांनी अकलुज येथील पोलीस वसाहतीमध्ये राहत्या घरी गळफास आत्महत्या केल्याची घटना घडली आहे .
याबाबत पोलीसांनी कडून प्राप्त झालेली अधिक माहिती अशी की,मयत पोलीस हवालदार "सोमथान कोळी" यांचे मुळ गांव रा. पंढरपूर होते.ते पत्नी व दोन मुलांसह अकलुज येथील पोलीस वसाहतील कॉलनीमध्ये राहत होते.
दिनांक २८/०८/२०२४ रोजी दु.१.३० ते २.३० वा. चे दरम्यान पोलीस हवालदार सोमनाथ कोळी यांनी राहते घरातील बेडरुममधील छताच्या पंख्याला साडीने गळफास घेतल्याने त्यांना त्यांची पत्नी व बाजुस राहणारे पोलीस अंमलदार यांनी तात्काळ वाहनातुन उपचारासाठी अकलाई आय.सी.यु. सेंटर अकलूज येथे घेवुन गेले.तेथील डॉक्टरांनी तपासून ते मयत झाले असलेचे घोषित केले.
त्यांचे पश्चात त्यांच्या कुटुंबात पत्नी, दोन मुले, आई, भाऊ, भावजय असा परिवार आहे.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा