इंदापूर तालुका...... प्रतिनिधी एस. बी. तांबोळी, मोबाईल-8378081147
--- मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा शुभारंभ आमदार दत्तात्रय भरणे यांच्या विशेष उपस्थित इंदापूर तालुक्यातील विविध गावांमध्ये रविवार ४ ऑगस्ट रोजी होणार असल्याची माहिती सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील साखर कारखान्याचे संचालक श्रीकांत बोडके यांनी दिली.
यामध्ये सकाळी १० वाजता - रेडा, १०/४५ वाजता - भोडणी, दुपारी ११/३० वाजता - शेटफळ हवेली, १२/३० वाजता - सुरवड, १/१५ वाजता - वकीलवस्ती, २/१५ वाजता - सराटी, ३ वाजता - पिंपरी बुद्रुक,
३/४५ वाजता - नीरा नरसिंहपूर येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे फॉर्म मोफत भरून दिले जाणार आहेत. सोबतच संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना यांचे फॉर्मही स्वीकारले जाणार आहेत. तसेच मोफत रेशन कार्ड दुरुस्ती व नवीन रेशन कार्ड बनविण्याचे शिबीरही आयोजित केले आहे. तरी सर्व लाभार्थी भगिनींनी उपस्थित राहून या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन पिंपरी बुद्रुकचे सरपंच भाग्यश्री सुदर्शन बोडके, नरसिंहपूरचे सरपंच अर्चना नितीन सरवदे यांनी केले आहे.
---------------------------
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा