*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो;--9730 867 448
भाजपचे सातारा जिल्हा युवा मोर्चाचे सरचिटणीस रणजित शिंदे यांनी माळशिरस तालुक्यातील शिंदेवाडी येथील व्यापाऱ्याचे सुमारे साडेआठ लाख रुपये किमतींच्या उधार नेलेल्या मालाचे पैसे न देता उलट त्याच व्यापाराच्या नावाने खाजगी संस्थेकडून अडीच लाख रुपये कर्ज उचलून त्याचा स्वतःसाठी वापर केल्याबाबतचा गुन्हा सदर व्यापार्याने दाखल केला आहे.
शिंदेवाडी तालुका माळशिरस येथील सुरज शिंदे यांचे किराणा मालाचे दुकान असून त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून, शिंदेवाडी गावाशेजारील हनुमंतवाडी येथील रणजित पोपट शिंदे यांनी आपण बारामती येथे हॉटेल रॉयल इन चालवण्यास घेतले असल्याचे सांगून हॉटेलसाठी किराणा माल खरेदी केला. पहिले सुमारे दोन महिने माल नेवून वेळेवर पेमेंट देत होते. परंतु ऑक्टोबर २०२२ पासूनची मालाची बिले थकीत ठेवली गेली ती अद्याप दिली नाही त्याची एकूण बाकी ८५००००/- (आठ लाख पन्नास हजार) रुपये येणे बाकी आहे. बाकीची मागणी केल्यास दर पंधरा दिवसानंतरच वायदे करू लागले त्यामुळे सुरज शिंदे व त्याचे वडील सहयोग मधील राजगड या ठिकाणी रणजित शिंदे यांना पैसे मागण्यासाठी गेले. यावेळी रणजीत शिंदे यांनी थोडे थांबावे लागेल तुमचे पैसे देणार आहे, आता तुमाला माझ्या तिरंगा शाळेच्या अकौंटं वरून दोन लाख देण्याची व्यवस्था करतो असे सांगितले. त्यासाठी तुम्ही तिरंगा अनिमेशन व पब्लिक स्कूल या ठिकाणी जाऊन तुमचे आधार व पॅन कार्ड झेरोक्स अर्सिना बागवान यांचेकडे जमा करा, आठ दिवसात दोन लाख रुपये तुमच्या खात्यावर ऑनलाईन पाठवतो असे सांगितले. त्यानुसार सुरज शिंदे यांनी संस्थेत जाऊन आधार व पॅन कार्डाची झेरॉक्स अर्सिना बागवान यांना दिली व त्यांनी सांगितले, चार पाच दिवसात रक्कम तुमच्या खात्यात जमा होईल. त्यांनतर तीन दिवसांनी अर्सिना बागवान मॅडम यांचा फोन आला कि, तुमचे पेमेंट जमा होणार आहे तुमच्या मोबाईलवर ओ.टी.पी. येईल तो सांगा, त्यानुसार माझ्या मोबाईल नंबरवर आलेला ओ.टी.पी. असिना यांना दिला व त्यांनी सांगितले दोन दिवसात पेमेंट ऑनलाईन जमा होईल. आठ दिवस झाले तरीदेखील पेमेंट जमा झाले नाही म्हणून अर्सिना बागवान मॅडम यांना विचारले असता त्यांनी सांगितले रणजित शिंदे सरांशी बोलून घ्या, लगेच रणजित शिंदे यांचेशी फोनवर बोलणे केले असता त्यांनी सांगितले तुमचे पेमेंट प्रोसेस झाले नाही बँकेने रिजेक्ट केले आहे. मी तुम्हाला तुमची सर्व बाकी दोन महिन्यात जमा करीन दोन महिने थांबा. डिसेंबर २०२३ ते आज अखेर वेळोवेळी रणजित शिंदे यांचेकडे मी पैशाची रक्कम मागणी करत आहे.परंतु ते अद्याप पुढील तारीख देत आले आहेत. दिनांक ०१ जुलै, २०२४ रोजी रमैया कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेड, नॉन बँकिंग फायनान्स कंपनी, बँगलोर यांची नोटीस सदरच्या नोटीस बाबत सदरच्या फायनान्स कंपनीकडे चौकशी केली असता समजले माझे नावाने तिरंगा अनिमेशन व पब्लिक स्कूल, बारामती यानी शिक्षणसाठी २५००००/- दोन लाख पन्नास हजार रुपये कर्ज काढून ते स्वतःसाठी वापरले आहे. या कर्जाच्या कागदपत्र नक्कल फायनान्स यांचेकडून घेऊन पहिले असता. रणजित पोपट शिंदे, अर्सिना बागवान व रमैया कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेड यांनी संगनमताने माझ्या आधार व पॅन कार्डचा गैरवापर करून माझे नावे बोगस २५००००/- रुपये कर्ज काढून फसवणूक केल्याची कायदेशीर तक्रार केली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा