Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

बुधवार, २१ ऑगस्ट, २०२४

*श्री तुळजाभवानी अभियांत्रिकी महा विद्यालयात कौशल्य विकास विद्यापीठ चालू करण्यास तालुक्यातून विरोध*


 

*टाइम्स 45 न्युज मराठी*

 *मो;--9730 867 448*

तुळजापूर 

येथिल श्री तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालयात मागील चाळीस वर्षापासून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी अत्यल्प फी मध्ये उच्च शिक्षण सुविधा पुरवत आहे परंतु आता मंदिर संस्थान व्यवस्थापन अभियान अभियांत्रिकी महाविद्यालय बंद करून तेथे कौशल्य विकास विद्यापीठ चालू करण्याचा घाट घालत आहे तुळजापूर सारख्या ग्रामीण भागात कौशल्य विकास विद्यापीठ चालू शकत नाही परंतु काही लोक राजकीय स्वार्थासाठी येथे कौशल्य विकास विद्यापीठ चालू करून राजकीय पोळी भाजत आहेत हे महाविद्यालय शासनास हस्तांतरण करण्याचा ठराव झाला असताना येथे वेगळेच घडत आहे हे तात्काळ थांबून आई तुळजाभवानी च्या नावाने चालू असलेल्या महाविद्यालय शासनात हस्तांतरित करावे त्यासाठी आम्ही आपणास सहकार्य करू परंतु आम्ही हे महाविद्यालय बंद होऊ देणार नाही एक चालू महाविद्यालय बंद करून नवीन विद्यापीठ चालू करणे योग्य वाटत नाही आपण इतर ठिकाणी कौशल्य विकास विद्यापीठ चालू करू शकता तरी याचा विचार करावा अन्यथा तुळजापूर तालुका महाविकास आघाडी च्या वतीने या विरोधात तुळजापूर शहर व तालुका यांच्यावतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे



 यावेळी एडवोकेट धीरज पाटील श्याम पवार उत्तम अमृतराव अनिल शिंदे अमोल कुतवळ अनमोल साळुंखे राहुल खपले शरद जगदाळे सुधीर कदम चंद्रकांत सोनवणे बाळासाहेब केसरकर संदीप कदम तोफिक शेख संतोष मकरंद बामनकर धनराज शिंदे नवनाथ जगताप गोविंद देवकर संदेश माने आदिंसह महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षरी आहेत

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा