Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शुक्रवार, १६ ऑगस्ट, २०२४

*, तुळजापूर येथे ,राज्यातील शिघ्रसंचार द्रुतगती महामार्गांमधील बाधित शेतकऱ्यांचे साखळी उपोषण*


 

*टाइम्स 45 न्युज मराठी*

 *मो;--9730 867 448*

राज्यातील शीघ्रसंचार  द्रुततगती महामार्गा मधील बाधित शेतकऱ्यांच्या विविध समस्या बाबत तुळजापूर येथे आंबेडकर चौकात राज्यातील बाधित शेतकऱ्यांचे साखळी उपोषणास प्रारंभ झाला असून त्या शेतकऱ्यांच्या विविध मागण्या पुढीलप्रमाणे


1)पवणार ते पत्रादेवी शिघ्रसंचार द्रुतगती  महामार्ग (शक्तिपीठ महामार्ग) कायमस्वरूपी रद्द करावा. रद्द केल्याचा शासन निर्णय जारी करावा. 

2)पुणे - नाशिक शिघ्रसंचार द्रुतगती  महामार्गकायमस्वरूपी रद्द करावा. रद्द केल्याचा शासन निर्णय जारी करावा.


3)ज्या ग्रीनफिल्ड महामार्ग चे भुसंपादन अंतिम टप्प्यात आहे. त्यांना Right to Fair Compensation and Transparency in Land Acquisition, Rehabilitation and Resettlement Act, 2013 हा मूळ कायदा जशास तसा लागू करावा. 

4)द्विपिकीय जमिनी वगळून महामार्ग करावेत.

या प्रमुख मागण्यांसाठी तुळजापूर येथे साखळी उपोषणास आज सुरुवात झाली आहे. सदरील उपोषणास 1)पवनार ते पत्रादेवी शिघ्रसंचार द्रुतगती महामार्ग (शक्तिपीठ महामार्ग)

2) सुरत चेन्नई शिघ्रसंचार द्रुतगती महामार्ग 

3)जालना नांदेड शीघ्र संचार द्रुतगती  महामार्ग (समृद्धी महामार्ग) 

4) पुणे नाशिक शिघ्रसंचार द्रुतगती महामार्ग

5)अलिबाग विरार शिघ्रसंचार द्रुतगती महामार्ग 

या साखळी उपोषणास विविध राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मंडळीनी भेटी दिल्या आहेत. धाराशिव जिल्हा काँग्रेस चे जिल्हाध्यक्ष  धीरज कदम पाटील यांनी या आंदोलन स्थळास भेट दिलीआहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा