Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शुक्रवार, १६ ऑगस्ट, २०२४

*चांदापुरी ता.माळशिरस येथील 4 युवकांची पोलीस दलात तर 2 युवतीची शासनाच्या विविध विभागात निवड झाल्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने सत्कार*

 


*माळशिरस तालुका -प्रतिनिधी*

 *रशिद -- शेख*

 *टाइम्स 45 न्युज मराठी

चांदापुरी येथील चार युवक1) निहार जमीर पठाण ,2)अलियार खान 3)अजिज खान पठाण व 4)रणजीत संजय वाघ यांची महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस दलात येथे नुकतीच निवड झाली.



यामध्ये निहार जमीर पठाण यांची महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 7 दौंड जिल्हा पुणे अलियार खान अजिज खान पठाण यांची महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक १० सोलापूर आणि रणजीत संजय वाघ यांची महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 3जालना येथील निवड झाली. तसेच चांदपुरी गावाच्या कन्या मनीषा पोपट मगर यांची अकलूज नगर परिषद येथे मुख्य कार्यकारी अधिकारी पदी निवड झाली तर स्वप्नाली सर्जेराव कोपनर यांची महसूल सहाय्यक अधिकारी मंत्रालय मुंबई येथे एमपीएससी मधून निवड झाली आहे .हे सर्व अतिशय सामान्य कुटुंबातून आलेले जिद्द व मेहनत या जोरावर हे यश मिळवले आहे. त्याबद्दल चांदापुरी ग्रामपंचायत , जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चांदपुरी , प्रतापसिंह विद्यालय चांदापूरी, ग्रामपंचायत कार्यालय पठाण वस्ती, शेतकरी ग्रामीण पतसंस्था चांदापुरी यांच्यातर्फे तसेच परिसरातील ग्रामस्थांनी सत्कार करून अभिनंदन केले आहे . तसेच भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा