Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शनिवार, १० ऑगस्ट, २०२४

*तुळजापूर तालुक्यातील माळुंब्रा येथील अपात्र ठरलेल्या सरपंच-" सुरेखाताई नागनाथ सुतार "यांचे सरपंच पद "निवडणूक आयोगाकडून" झाले" पाञ!"*

 


*टाइम्स 45 न्युज मराठी*

 *मो;--9730 867 448

तुळजापूर तालुक्यातील माळुंब्रा येथील

सन २०२२ मध्ये ग्रामपंचायत माळुंब्रा, येथील ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुक पार पडल्यानंतर सदर निवडणुकीमध्ये सरपंच म्हणुन सौ. सुरेखा नागनाथ सुतार या बहुमताने जनतेतुन निवडुन आल्या. त्यानंतर दोन वर्षांनी विनोद राजाराम देवकर यांनी मा. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणुक अधिकारी धाराशिव यांचेकडे ग्रामपंचायत अधिनियम कलम 14 ब (1) प्रमाणे सरपंच सौ. सुरेखा सुतार यांनी ग्रामपंचायत निवडणुक लढवत असताना थेट सरपंच निवडणुक व एका प्रभागातुन सदस्य पदाच्या निवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्र सादर केले व सदर दोन्ही नामनिर्देशनपत्रा सोबत एकच बँक खाते दर्शवले. तसेच निवडणुकीचा खर्च राज्य निवडणुक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार विहित पद्धतीने दाखल केला नाही. या मुद्यावर त्यांना अपात्र करावे म्हणुन प्रकरण दाखल केले होते. त्यावर मा. जिल्हाधिकारी साहेब धाराशिव यांनी दि.24/06/2024 रोजी सरपंच सौ. सुरेखा सुतार यांना अपात्र करुन 05 वर्षांकरिता निवडणुक लढविण्यास निरर्ह ठरवले होते. सदर निर्णयाच्या विरुद्ध संरपंच सौ. सुरेखा सुतार यांनी ॲड. रमेश एस. मुंढे यांचे मार्फत मा. राज्य निवडणुक आयोग मुंबई यांचेकडे अव्हान याचिका दाखल केली होती. विशेष बाब म्हणजे सदरची अव्हान याचिका दि.01/07/2024 रोजी दाखल केल्यानंतर मा.राज्य निवडणुक आयोगाने प्रकरणात दि.30/07/2024 रोजी प्रकरण सुनावणीस ठेवुन प्रकरणात सदर दिवशीच अंतिम सुनावणी घेवुन सरपंच सुरेखा सुतार यांचे बाजुने ॲड. रमेश मुंढे यांनी केलेला युक्तीवाद ग्राह्य धरुन दि.05/08/2024 रोजी निर्णय होवुन मा. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणुक अधिकारी धाराशिव यांचा दि.24/06/2024 रोजीचा निर्णय रद्द करुन सुरेखा सुतार यांचे सरपंच पद अबाधित ठेवले आहे.याप्रकरणी ॲड



आर.एस. मुंढे धाराशिव यांनी केस लढवली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा