उपसंपादक -- नूरजहाँ शेख
टाइम्स 45 न्युज मराठी
माळशिरस तालुक्यातीव्ल शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या प्रसन्न फाउंडेशन,व प्रसन्न पब्लिकेशन हाऊस आयोजित दीपस्तंभ पुरस्कार देऊन जिल्ह्यातील व राज्यातील शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय वैशिष्ट्यपूर्ण कार्य करणाऱ्या संस्थापक शिक्षक व शिक्षण क्षेत्रातील योगदान देणाऱ्या मान्यवरांचा प्रसन्न फाउंडेशन व प्रसन्न पब्लिकेशनच्या वतीने दीपस्तंभ पुरस्कार देऊन सन्मानित करून त्यांचा सन्मानपत्र व पुरस्कार देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात येतो त्याप्रमाणे सोलापूर जिल्ह्यातील एकूण 30 मान्यवरांचा पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे त्याचप्रमाणे माळशिरस तालुक्यातील कुसमोड ( पिलीव )येथील श्रीमती किसाबाई शंकर सरगर बहुउद्देशीय संस्था कुस्मोडचे संस्थापक अध्यक्ष मा. सागर शिवाजी सरगर यांनी केलेल्या संस्था संचलित कै.अमोल पिसे इंग्लिश मीडियम स्कूलची अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत स्थापना करून थोडक्या विद्यार्थ्यावर सुरू केलेले इंग्लिश मीडियम स्कूल आज 400 विद्यार्थ्यांच्या वर या इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शिक्षण घेत असून त्यांचा शैक्षणिक दृष्ट्या सर्वांगीण विकास साधण्याच्या दृष्टीने आजच्या स्पर्धेच्या युगात आत्मविश्वासाने विद्यार्थ्यांना जगामध्ये वावरण्यासाठी विद्यार्थ्यांच्या पंखांमध्ये बळ देण्याचे कार्य इंग्लिश मीडियम स्कूलच्या माध्यमातून करीत असताना चिमुकल्या विद्यार्थ्यांना शिक्षणाची व स्पर्धेच्या जगामध्ये वावरण्याची दिशा देण्याचे उल्लेखनीय वैशिष्ट्यपूर्ण असे दीपस्तंबासारखे शैक्षणिक कार्य करीत असल्यामुळे संस्थापक अध्यक्ष मा. सागर शिवाजी सरगर यांना प्रसन्न फाउंडेशनने दीपस्तंभ हा मानाचा आदर्श गौरव पुरस्कार फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सुनील लिगाडे व अध्यक्ष नवनाथ धांडोरे यांनी त्यांच्या या शैक्षणिक कार्याची दखल घेऊन त्यांना दीपस्तंभ आदर्श संस्थापक गौरव पुरस्कार जाहीर केला असून तशा आशयाचे पत्र त्यांना प्रदान करण्यात आले असून येत्या 11 ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी दहा वाजता अकलूज येथील स्मृती भवन येथे राज्याचे माजी उपमुख्यमंत्री माजी खासदार विजयसिंह मोहिते पाटील खासदार धैर्यशील मोहिते पाटील व विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत समारंभ पूर्वक प्रदान करण्यात येणार असल्याचे पुरस्कार प्राप्त संस्थापक सागर सरगर यांनी माध्यमाशी बोलताना सांगितले आहे
त्यांना जाहीर झालेल्या या मानाच्या पुरस्काराबद्दल त्यांचे पिलीव व माळशिरस तालुक्यातील परिसरातून त्यांचे चाहते शिक्षक शिक्षण प्रेमी पालक विद्यार्थी ग्रामस्थातून स्वागत केले जात आहे. त्यांच्यावर कौतुकाचा व आभिनंदनाचा वर्षाव होत आहे
फोटो संस्थापक अध्यक्ष मा. सागर शिवाजी सरगर
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा