Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

रविवार, १ सप्टेंबर, २०२४

*धक्कादायक* *वडापाव खाणे पडले महागात... वडापाव खाई पर्यंत चोरट्याने केले तब्बल 14 लाखाचे दागिने लंपास!*

 


*टाइम्स 45 न्युज मराठी*

 *मो;--9730 867 448

*पुणे-* पुण्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. यात भुरट्या चोरीच्या घटना देखील वाढल्या आहेत. अशीच एक घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. एका जोडप्याला वडापाव खाणे चांगलेच महागात पडले आहे. चोरट्यांनी महिला गाडी लावत असतांना तिचं लक्ष नसल्याची संधी साधून गाडीच्या हुकाला लावलेली सोन्याची बॅग लंपास केली. तब्बल १४ लाख रुपयांचे दागिने चोरट्यांनी लंपास केले. 


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना हडपसर येथे एका वडापावच्या गाडीसमोर घडली आहे. एक जोडपे वडापाव खाण्यासाठी थांबले असता चोराने त्यांची गाडीला लावलेली दागिन्यांची पिशवी महिलेच्या नकळत लंपास केली. या पिशवीत १९५ ग्रॅम सोन होत. आताच्या बाजारभावानुसार तब्बल १४ लाख रुपयांचं सोनं चोरट्यांनी लंपास केलं आहे. मांजरीमध्ये राहणारे एका दाम्पत्याने बँकेत तारण ठेवलेलं १९५ ग्रॅम सोनं सोडवून आणलं होतं. सोन्याची बॅग घेऊन दोघेही घरी परत जात होते. यावेळी त्यांनी दागिन्यांची पिशवी मोपेड बाईकच्या पुढे लटकवली होती. 



घरी जात असतांना दोघेही नातवंडांना वडापाव घेण्यासाठी हडपसरमधील वडापावच्या गाडीजवळ थांबले. यावेळी महिलेचे पती वडापाव घ्यायला गेले. तर त्यांच्या पत्नी गाडीपाशी उभ्या होत्या. यावेळी महिलेला चोरट्यांनी तुमच्या गाडीच्या मागे पैसे पडल्याची बतावणी केली. गाडीच्या मागे पैसे खरच पडले आहे का हे पाहण्यासाठी ही महिला खाली वाकली. यावेळी त्यांच्यावर लक्ष ठेऊन असलेल्या एकाने त्यांच्या गाडीवरील हुकला लटकवलेली दागिन्यांची पिशवी घेऊन पसार झाला. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. दाम्पत्याच्या बॅगेत सोन्याच्या बांगड्या, अंगठ्या व इतर दागिने मिळून जवळजवळ १९५ ग्रॅमचे सोन्याचे दागिने होते. याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा