Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

रविवार, १ सप्टेंबर, २०२४

*ब्रेकिंग न्यूज* *कोकण, मध्यमहाराष्ट्र, आणि मराठवाड्यात आज जोरदार पावसाची शक्यता!*

 


*टाइम्स 45 न्युज मराठी*

 *मो;--9730 867 448

*मुंबई-* सप्टेंबर महिन्यात देखील पावसाचा जोर कायम राहणार आहे. आज महिन्याच्या पहिल्याच दिवशी राज्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज विदर्भ, कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात जोरदार पावसाची शक्यता आहे. विदर्भातील काही जिल्ह्यांना आज रेड अलर्ट व यलो अलर्ट देण्यात आला आहे.


विदर्भातील यवतमाळ, नागपूर, चंद्रपूर जिल्ह्यात मुळसाधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस होणार असल्याने या ठिकाणी रेड अलर्ट देण्यात आला आहे. तर, अमरावती, गडचिरोली आणि वर्धा जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर अकोला, भंडारा, बुलढाणा, गोंदिया, वाशिम या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. कोकणातील रायगड रत्नागिरी जिल्ह्यात यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर, मध्य महाराष्ट्रातील, धुळे, जळगाव, नाशिक, अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, तर मराठवाड्यातील स,भाजीनगर जालना, परभणी, बीड, हिगोली, लातूर उस्मानाबाद या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर नांदेड जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.


रायगड रत्नागिरी या जिल्ह्यात व पुणे, सातारा व घाट विभागात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच मराठवाड्यात व मध्य महाराष्ट्रातील बऱ्याच जिल्ह्यात विजांचा कडकडाट मेघगर्जना व ताशी ४० ते ५० किलोमीटर वेगणे वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता असल्यामुळे येथे येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. दिनांक २ सप्टेंबर रोजी परभणी, हिंगोली, अकोला, अमरावती, गडचिरोली, वर्धा या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांचा कडकडाट गर्जनेसह जोरदार ते अति जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे वरील जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे. तर राज्यातील उर्वरित जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता असल्यामुळे तेथे येलो अलर्ट देण्यात आलेला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा