*विशेष ----प्रतिनिधी*
*एहसान मुलाणी*
*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो--9096 837 451*
श्री समर्थ स्पोर्ट्स नर्सरी व महा थ्रो बॉल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने पहिली राज्यस्तरीय ज्युनिअर थ्रो बॉल अजिंक्यपद स्पर्धा श्री सुशीलकुमार शिंदे शारीरिक शिक्षण महाविद्यालय नेहरूनगर सोलापूर या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती. सदर स्पर्धेच्या बक्षीस समारंभ प्रसंगी श्रीनिवास भाऊ संगा ( अध्यक्ष तेलगू भाषिक एक संघ), फिरोज मुलाणी, ( मराठी चित्रपट निर्माता दिग्दर्शक), सचिन चव्हाण ( संस्थापक मागास समाज सेवा मंडळ) गजेंद्र जादगी, झाकीर शेख, सुभाष मदने, चंद्रकांत मिस्कीन, जालिंदर साळवी ( PSI), राहूल वाघमारे ( सचिव महा. थ्रो बॉल असोसिएशन), राजेंद्र माने ( सचिव सोलापूर शहर थ्रो बॉल असो., विलास निर्भवणे, दत्तगिरी गोसावी, सुहास छंचुरे ( अध्यक्ष (सोलापूर शहर थ्रो बॉल असो).यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. स्पर्धेतील विजय संघांना मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले.
याप्रसंगी मुंबई उपनगर सचिव चंद्रकांत घोडेराव, बीड जिल्ह्याचे सचिव अमोल सावंत, नगर जिल्ह्याचे सचिव बाबा गायकवाड, धुळे सचिव विशाल पवार ,कोल्हापूर संदीप जाधव ,हे उपस्थित होते.
या स्पर्धेसाठी पंच म्हणून अतुल हाबळे ,सागर वर्मा, नंदकिशोर गिरी ,अजित पाटील अक्षय माने यांनी काम पाहिले.
या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी ज्ञानेश्वर काळे, शब्बीर शेख, प्रसन्न काटकर ,देविदास शिंदे, रवींद्र चव्हाण, निर्जला तळवार, सोनाली मुनगीपाटील यांनी परिश्रम घेतले.
*अंतिम निकाल मुले*
प्रथम. मुंबई उपनगर
द्वितीय नाशिक
तृतीय अहमदनगर
*उत्कृष्ट खेळाडू ऐश्वर्य कलबाटे.मुंबई (उपनगर)*
*अंतिम निकाल मुली*
प्रथम. नाशिक
द्वितीय बीड
तृतीय मुंबई शहर
*उत्कृष्ट खेळाडू प्रांजल जाधव, प्रांजल कुशारे ( नाशिक )*







कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा