*अकलुज ------प्रतिनिधी*
*केदार लोहकरे*
*टाइम्स 46 न्युज मराठी*
कोडोली ( ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर ) / तारीख २२: " विना कष्ट करता कोणी मोठे होत नसते. प्रामाणिकपणे काम केल्यास त्याचे चांगलेच फळ मिळते. कर्मवीर भाऊराव पाटील कष्टातूनच महामानव झाले " , असे मनोगत प्रा. संजय जाधव यांनी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त प्रमुख वक्ते म्हणून बोलताना व्यक्त केले
कोडोली ( ता. पन्हाळा , जि. कोल्हापूर ) येथील यशवंत शिक्षणशास्त्र महाविद्यालयात (बी. एड. कॉलेज ) आयोजित कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंती कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून प्रा. जाधव बोलत होते. प्राचार्य डॉ. विश्वनाथ पाटील यांची प्रमुख उपस्थिती तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी क्रीडा विभागाचे प्रमुख प्रा. प्रकाश बुगले होते. सत्र ३ च्या विद्यार्थी - शिक्षकांच्या क्रीडा स्पर्धेने कर्मवीर अण्णांना अभिवादन करण्यात आले. यावेळी प्रा. श्रीमती गुलनास मुजावर आणि कार्यालयीन अधीक्षक एस. के. पाटील कार्यक्रमास उपस्थित होते.
स्वप्नाली मांडरेकर आणि अनिरुद्ध कांबळे या विद्यार्थी - शिक्षकांनी मनोगत व्यक्त केले. है सुभाष चौगले यांनी प्रास्तविक केले. प्रज्ञा मराठे यांनी आभार मानले.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा