Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

गुरुवार, ५ सप्टेंबर, २०२४

*अकलूज पंचवटी भागातील स्थानिक नागरिकांना रस्ते, पाणी ,गटारी ,दिवाबत्ती -या पायाभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अन्यथा..... "पीपल्स रिपब्लिकन पार्टी "च्या वतीने आंदोलनाचा इशारा..*


 

विशेष ----प्रतिनिधी

  एहसान  मुलाणी

 टाइम्स 45 न्युज मराठी

   मो--9096 837 451

पूर्वीची अकलूज ग्रामपंचायत व सध्याची अकलूज नगरपरिषद अस्तित्वात येऊनही गेली कित्येक वर्षापासून अकलूज नगरपरिषद अंतर्गत असणाऱ्या पंचवटी भागातील नागरिकांना रस्ते पाणी गटारी दिवाबत्ती या पायाभूत सुविधांपासून आजपर्यंत वंचित रहावे लागले आहे या पायाभूत मागण्यांसाठी येथील स्थानिक नागरिकांनी वेळोवेळी अकलूज नगरपरिषदेचे मुख्याधिकारी व संबंधित विभाग प्रमुख यांना भेटून पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची विनंती केली होती व याबाबत पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने सदरच्या मागण्यांसाठी अकलूजच्या उपविभागीय कार्यालयासमोर या अगोदरही आंदोलन केले होते परंतु आजतागायत येथील नागरिकांना रस्ते पाणी गटारी व दिवाबत्ती या पायाभूत सुविधा नगरपरिषदेने उपलब्ध करून दिल्या नाहीत यामुळे येथील स्थानिक नागरिकांसह शालेय विद्यार्थ्यांना लहान मुलांना याचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्रास सहन करावा लागत आहे या होणाऱ्या त्रासाबाबत येथील स्थानिक नागरिकांनी पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे महाराष्ट्र युवक प्रदेशाध्यक्ष सोमनाथ भोसले यांना फोनवरून कळविल्यानंतर स्थानिक नागरिकांना नगरपरिषदेला बोलावून अकलूजचे मुख्याधिकारी दयानंद गोरे यांना भेटून पंचवटी भागातील स्थानिक नागरिकांना रस्ते पाणी गटारी व दिवाबत्ती या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी या अगोदरही पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले होते परंतु आज पर्यंत या भागातील मागण्या पूर्ण करण्यात आलेल्या नाहीत त्यामुळे स्थानिक नागरिकांना सोबत घेऊन पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे युवक प्रदेशाध्यक्ष सोमनाथ भोसले यांनी अकलूज नगरपरिषदेचे मुख्याधिकारी दयानंद गोरे यांना याचा जाब विचारून आपण समक्ष या भागाची पाहणी करण्यासाठी चला असे सांगून मुख्याधिकारी दयानंद गोरे यांना सोबत घेऊन ते पंचवटी भागातील पाहणी करण्यासाठी गेले असता तेथील दयनीय परिस्थिती बघून नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांनी दोन दिवसांमध्ये स्थानिक नागरिकांना रस्ता तयार करून देण्यात येईल व या भागातील राहिलेली सर्व विकासकामे 6 महिन्यांच्या आत केली जातील असे सांगितले यावर येथील स्थानिक नागरिकांना दोन दिवसांमध्ये रस्ता तयार करून न दिल्यास सोमवार 9 सप्टेंबर 2024 रोजी पासून रस्ता तयार होईपर्यंत अकलूजचे मुख्याधिकारी दयानंद गोरे यांच्या कार्यालयामध्ये स्थानिक नागरिकांना सोबत घेऊन धरणे आंदोलन करण्याचा इशारा पीपल्स रिपब्लिकनर पार्टीचे महाराष्ट्र युवक प्रदेशाध्यक्ष सोमनाथ भोसले यांनी दिला.



यावेळी पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे माळशिरस तालुकाध्यक्ष हेमंत कांबळे तालुका युवक अध्यक्ष सचिन मोरे तालुका युवक सरचिटणीस तुषार केंगार सामाजिक कार्यकर्ते शिवराम गायकवाड अकलूज शहराध्यक्ष शिवाजी खडतरे माधुरी वाघचौरे अलका किर्ते सुरज रणदिवे अशोक कारंडे दत्ता वाघमारे मच्छिंदर कोडक सारिका माने संगिता गायकवाड छाया लोखंडे रेखा चांदणे गिरजा कारंडे तनुजा शेख मदिना तांबोळी राधा निंबाळकर यांचेसह स्थानिक महिला  मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होत्या




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा