*मायाताई सागर पाईकराव*
*टाइम्स 45 न्युज मराठी*
डॉ.बाबासाहेब आंबेडकर संस्थापित,पीपल्स एज्युकेशन सोसायटी मुंबई संचलित,नागसेन हायस्कूल प्रभात नगर,नांदेड या शाळेच्या मुख्याध्यापक पदी याच शाळेचे सिनियर मोस्ट शिक्षक,एस.बी.फुलेवार यांची वर्णी लागली आहे.
माजी मुख्याध्यापक एस.एच.गव्हाणे यांनी वैद्यकीय कारणास्तव अनिश्चित काळासाठी रजा घेतल्यामुळे मुख्याध्यापक पद रिक्त झाले होते.तसे एस.बी.फुलेवार हे नेहमीच वादग्रस्त व्यक्तीमत्व राहिलेले आहे.नांदेड येथे त्यांच्याविषयी जास्तच चर्चा होऊ लागल्यामुळे ऑनरेबल चेअरमन आनंदराज आंबेडकर साहेब यांनी त्यांची मातोश्री रमाबाई हायस्कूल सिडको,औरंगाबाद येथे बदली करून त्यांना दिलासा व संरक्षणही दिले होते.
त्याचाच परिणाम म्हणून सिनियारिटीप्रमाणे व कायदेशीर त्यांचा क्लेम असल्यामुळे त्यांचे रीतसर प्रमोशन झाले.नागसेन हायस्कूलचा सेवानिवृत्त शिक्षक,सिद्धार्थ कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचा विद्यार्थी व ऑनरेबल चेअरमन आनंदराज आंबेडकर यांचा प्रतिनिधी म्हणून काल बुधवार दि. 4 सप्टेंबर 2024 रोजी माझी कर्मभूमी असलेल्या 'नागसेन हायस्कूल प्रभात नगर नांदेड' या शाळेत जाऊन मुख्याध्यापक एस. बी. फुलेवार यांचा सत्कार केला.
ज्यांनी शाळेच्या पहिल्या दिवशी शाळेच्या विद्यार्थ्यांना 50 डझन वह्या त्यांच्या ट्रस्टच्या वतीने दान दिल्या होत्या ते रिपब्लिकन सेनेचे महाराष्ट्र प्रदेश कमिटी सदस्य मोहन लांडगे हे माझ्या सोबत होते.या निमित्ताने शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांशी हितगुज करताना शिक्षकांनी आता भरपूर मेहनत घेऊन शाळेला चांगले दिवस आणण्याचे आश्वासन दिले.मी सुद्धा शिक्षक वृंदाला ऑनरेबल चेअरमन आनंदराज आंबेडकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पीपल्स एज्युकेशन सोसायटी,रिपब्लिकन सेना व पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या आजी माजी विद्यार्थ्यांच्या सहाय्याने सर्वतोपरी सहकार्य करण्याचा शब्द दिला.तसेच आनंदराज आंबेडकर यांच्या वतीने संरक्षणाची पूर्ण हमी दिली.शाळेच्या हिताच्या बाबतीत मी शेवटपर्यंत अजिबात तडजोड स्वीकारली नाही आणि आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत शाळेच्या हितासाठी झटत राहील.मुख्याध्यापक एस.बी.फुलेवार यांना परत एकदा शुभेच्छा देतो आणि त्यांच्या कार्यकाळात नागसेन हायस्कूलची भरभराट होवो अशी सदिच्छा व शुभेच्छा व्यक्त करतो.
श्रीपती ढोले मुख्य प्रवर्तक मिशन-ए-पीपल्स एज्युकेशन सोसायटी, मुंबई मो. 9834875500W. 8888578874




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा