Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शनिवार, ७ सप्टेंबर, २०२४

*पृथ्वीराज पाटील V/S जयश्री पाटील* *भाजपचा मास्टर स्ट्रोक मराठा कार्ड खेळणार*


 

*सांगली---पञकार*

 *इक्बाल  बाबासाहेब मुल्ला*

  *8983 587 160*

भाजपा  #मराठा  #कार्ड  खेळणार !

लोकसभा निवडणुकीत भाजपचा पारंपरिक हिंदू मतदार दुरावल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात भाजपा दुहेरी आकडा देखील गाठू शकली नाही.या मतांच्या "ध्रुवीकरणाचा" अंदाज भाजपा पक्षनेतृत्व  तसेच RSS च्या नेत्यांना आला आहे. म्हणूनच विद्यमान कार्यसम्राट आमदार   "सुधीर  गाडगीळ" आगामी विधानसभेच्या निवडणुकीत "चालणार"  नाहीत असा "ग्रह"  करून आगामी विधानसभा निवडणुकीत मराठा चेहरा  उभा करण्याचे "मनसुबे"  भाजपा आणि त्यांची "राजकीय नैपथ्य" करणारी टीम आखत आहे.

सांगलीमध्ये कोट्यवधी रुपयांचा निधी खेचत,सांगलीचा सर्वांगीण विकास  करत , कार्यसम्राट  ही जनसामान्यांची "उपाधी" पटकावणाऱ्या हिंदू - मुस्लिम व  "सर्वधर्मीय"  लोकप्रिय उमेदवाराला डावलण्याचे *पाप*  भाजपा च्या "स्वयंभू" नेत्यांना लागणार आहे. सुधीर गाडगीळ उमेदवार असते तर कदाचित भाजपा विजयी  झाली असती  तथापि त्यांच्याशिवाय कोणत्याही नेत्याला सांगलीत "विजय" मिळणे "दुरापास्त" बनणार आहे हें निश्चित ! 

सुधीरदादांना त्रास देणाऱ्या नेत्यांचा "ढोंगी" चेहरा जनतेसमोर  निश्चितपणे समोर येणार आहे . भाजपा आता मराठा कार्ड खेळण्याच्या तयारीत आहे असे दिसते . काँग्रेस ला "पराजित" करणारा तो  मराठा चेहरा कोण असेल ??? 

शिवाजी (पप्पू ) डोंगरे , पृथ्वीराज पाटील , पै .पृथ्वीराज पवार  धिरज सूर्यवंशी,नितीन चौगुले की आणखी कोणी ???


 भाजपचा मास्टरस्ट्रोक !


काँगेस च्या "पाटील" या मराठा उमेदवाराचा पराभव  करायचा असेल तर एकतर भाजपचा उमेदवार मराठा हवा किंवा भाजपाला आयात मराठा उमेदवार घ्यायला लागेल. त्यामुळेच उच्चपातळीवर अदभूत "रणनीती" ठरून भाजपने आखली असावी. समाजकारणात ,मार्केट मध्ये "काम " बोलत असते ,परंतु राजकारणात कधी कधी "गुणवान"  व्यक्तीचा बळी देखील जातो हें आज सिद्ध झाले आहे . असो , 

  लोकसभेप्रमाणे विधानसभेत देखील भाजपा विरुद्ध जनतेमध्ये "रोष" आणि राग आहे हें वास्तव आहे . जनतेला मंदिर - मस्जिद या वादात न पडता, विकास , महागाई, रोजगार आणि नोकऱ्या   हव्या आहेत . मतदारांचा भ्रमनिरास  झाल्यामुळे आगामी विधानसभेत देखील भाजपचे "पानिपत" निश्चित आहे. विधानसभा निवडणुकीत सध्या 70 पेक्षा जास्त जागा "भाजपा - महायुतीला" मिळण्याची "चिन्हे" नाहीत. त्यामुळेच सांगली विधानसभेच्या महासंग्रामात भाजपने मराठा कार्ड "खेळण्याची रणनीती आखली आहे हें आता स्पष्ट होत आहे. हाच भाजपाचा "मास्टरस्ट्रोक"आहे .


काँग्रेस पक्षाचे तिकीट जयश्री पाटील यांना मिळाले तर पृथ्वीराज पाटील कोणता पावित्रा घेतील ??


आज पृथ्वीराज पाटील यांचे तिकीट "फायनल" आहे असा "कयास" आहे . परंतु तसाच शब्द जयश्री पाटील यांना देखील पक्षश्रेष्टींनी दिला आहे. समजा जयश्री पाटील यांना तिकीट मिळाले तर पृथ्वीराज पाटील कोणती भूमिका घेणार??  पृथ्वीराज पाटील हें जयश्री पाटील यांना पाठिंबा देणार का बंडखोरी करणार  ???

 पृथ्वीराजबाबा काँग्रेस  पक्षाचे जोडे बाजूला करून *वभाजपा मध्ये  पक्षप्रवेश करतील का ??? "राजकारणात"  अशक्य काहीच नसते व नाही . त्यामुळे असे झाले तर पृथ्वीराज पाटील भाजपचे विधानसभेचे उमेदवार  असतील आणि त्यांची टक्कर काँग्रेस च्या नेत्या जयश्री पाटील यांच्याशी होईल.भविष्यात असे घडेल का ???

आणि जर सांगलीत काँग्रेस चे उमेदवार पृथ्वीराज पाटील असतील तर त्यांना  "पराभूत"  करण्यासाठी, जयश्री  पाटील या अजितदादा गटाच्या माध्यमातून बंडखोरीच्या "रणांगणात" असतील का ???

दुसरी शक्यता आणि अटकळ ही आहे की , भाजपचे उमेदवार हे  सुधीरदादाच असतील.  दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा  लाभ या उक्तीनुसार दोन्ही काँग्रेस च्या "मतविभागणीचा"  फायदा भाजपाला होऊन भाजपा *विजयी पताका  फडकवू शकते. 

सुधीर गाडगीळ यांचा विधानसभा न लढविण्याचा "निर्णय" कदाचित खुंटा षहलवून बळकट करण्याची "रणनीती"  देखील असू शकेल का ??


 *काँग्रेस उमेदवाराचा पाडाव ही "रणनीती"  असू शकते का ??


गेल्या निवडणुकीत पृथ्वीराज पाटील यांना जयश्री पाटील यांच्या सर्व 20 नगरसेवकांनी मदत  केली होती. जर पृथ्वीराज पाटील यांना उमेदवारी मिळाली  19 नगरसेवक जे  अलिप्त  आहेत, याचा "फटका" "महापालिका क्षेत्रात" 300 आंदोलन करून उल्लेखनीय कार्य करणाऱ्या पृथ्वीराज पाटील यांना बसू शकतो का .?? 

लोकसभा निवडणुकीत स्व .वसंतदादा  पाटील घराण्याला नेस्तनाबूत करण्यासाठी जंग जंग पछाडले गेले,त्यांच्या वारसांचे तिकीट देखील कापले गेले. महाविकास आघाडी मधील तिकीट वाटपात शरद पवार यांना विश्वासात घेऊन सहमतीने तिकीट वाटप झाले होते.  विशाल  पाटील यांना काँगेस तर्फे पक्षाचे तिकीट न देण्याच्या निर्णय राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवारांना माहित होता ना .??  

तात्पर्य सांगलीत स्व .वसंतदादा पाटील व स्व. मदनभाऊ पाटील यांच्या वारसांना तिकीट द्यायचे नाही हें राजकारणातील चाणक्यांनी ठरवले असेल तर जयश्री पाटील यांना काँग्रेस तर्फे तिकीट मिळेल का ??? राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही  जयश्री पाटील यांच्या पाठीशी प्रामाणिकपणे राहतील का ??? मदनभाऊ युवा मंच आणि स्व .मदन पाटील यांच्यावर प्रेम करणारे कार्यकर्ते विजयासाठी प्रचंड प्रयत्न करतील, मराठा बांधव तसेच अल्पसंख्यांक समाजाचे मतदान जयश्री पाटील यांना होईल परंतु ज्याप्रमाणे 2014 च्या विधानसभा निवडणुकीत  राष्ट्रवादी काँगेस पक्षाचे उमेदवार सुरेश पाटील यांना 5000 मते देऊन त्यांचा  करेक्ट कार्यक्रम करून भाजपचा उमेदवार  "निवडून" आणला गेला तसा "खेळ"  यावेळी (सहयोगी पक्ष ) म्हणून त्यांच्याकडून  घडणार नाही कशावरून ??? काँग्रेसचा उमेदवार जाणीवपूर्वक पराभूत होईल यादृष्टीने व्यूहरचना आखली जातं नाही ना ???


 *पृथ्वीराज पाटील यांचे  सेफ गेम प्लॅनिंग ??


गेल्या 3 वर्षांपासून जेव्हापासून जयश्री पाटील राजकारणात ठळकपणे सक्रिय झाल्या आहेत तेंव्हापासून पृथ्वीराज पाटील हें हिंदुत्व चा झेंडा फडकवण्यात अग्रभागी झाले आहेत असे "भासत" आहे . कारण कल्पद्रुम क्रीडांगण मध्ये त्यांच्या माध्यमातून  अयोध्या*येथील मंदिर प्रतिकृती ची उभारणी झाली, सर्वांचे आदर्श राजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ अखंड ज्योत असो, किंवा मारुती चौकाजवळील  धार्मिक कार्यक्रम  असो , किंवा अन्य विषय असो,पृथ्वीराज पाटील यांचा नेहमीच पुढाकार ठळकपणे  दिसून येत आहे. आत्तापर्यंत कधीही अशाप्रकारच्या कार्यक्रमाचे त्यांनी आयोजन केले नव्हते. त्यांनी अचानकपणे यु टर्न घेण्याचे कारण काय ??. हिंदुत्व आणि काँग्रेस या दोघांवर "हात" ठेवण्याचा त्यांचा प्रयत्न  जाणकारांच्या  नजरेत चाणाक्षपणे आल्यावाचून राहिला नाही .

भविष्यात पृथ्वीराज पाटील अथवा कोणताही  "मराठा उमेदवार"  जर भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवेल त्यांना भाजपचे सुधीर गाडगीळ त्याना 100% मदत करणार हें निश्चित ! परंतु RSS त्यांचे कामं प्रामाणिकपणे करेल याची श्वाशती काय ??

 *पृथ्वीराजबाबा पाटील यांना इकडे आड तिकडे विहीर !

सांगली जिल्ह्यातील काँग्रेस "रिचार्जे" करून काँग्रेस नेते *राहुल गांधी आणि मल्लीकार्जून खडगे यांच्या "स्वप्नातील" काँग्रेसला प्रगतीपथावर आणण्यासाठी 1000% " कार्य " कोणी  केले असेल तर "पृथ्वीराज पाटील" यांनीच ! 

स्व .गुलाबराव पाटील  यांच्या पश्चात काँग्रेस पक्ष  बुलंद करण्याचे कौतुकास्पद कार्य देखील पृथ्वीराज यांनी केले. परंतु आज त्यांची स्थिती इकडे आड तिकडे विहीर अशी झाली आहे.याला कारण देखील तसेच आहे .

पृथ्वीराज पाटील यांनी जर भाजपमध्ये प्रवेश केला तर "मराठा समाजाचा"  मोठा प्रवाह (जरांगे पाटील फॅक्टर) बाबांपासून दृर होण्याची शक्यता आहे. शिवाय अल्पसंख्यांक समाजाचे 100% मतदान पृथ्वीराज पाटील यांना मिळणार नाही. त्याशिवाय काँग्रेसचा मोठा जनाधार बाबांपासून दूर जाईल .

त्याशिवाय भाजपा आणि मोदी विरोधी जनतेची मते देखील त्याना मिळणार नाहीत.  केवळ मोदी विरोधी जनमानसाच्या मतांवरच त्यांना लढावे लागेल. 

दुसरीकडे काँगेस पक्षाने पृथ्वीराज पाटील यांना "तिकीट"  दिले तर  जयश्री पाटील यांचे कार्यकर्ते नाराज होणार. मदनभाऊंचे  किती आणि कोणते कार्यकर्ते पृथ्वीराज पाटील यांच्यासाठी राबणार  ?? जिल्हापरिषद तसेच महापालिकेचे किती सदस्य /नगरसेवक त्याना मदत करणार ??? 300 आंदोलन करून देखील काँग्रेस च्या 20 पैकी 19 नगरसेवक पृथ्वीराज पाटील यांच्यापासून "फारकत" घेत असतील तर पृथ्वीराज बाबा कोणत्या "निकषावर" काँग्रेस तर्फे निवडणूक लढवणार ??? लोकसभेला स्व.वसंतदादा घराण्यावर झालेला अन्याय हा मुद्दा होता आणि *नरेंद्र मोदी आणि भाजपचा पराभव हें ध्येय होते म्हणून जनतेने उत्स्फूर्त पणे "मतदान" केले आणि भाजपाला पराभूत केले. मोदी हटाव या एकाच निकषावर विधानसभेला ही जादू दिसेल का ? विशाल पाटील यांच्याबाबतीत जो प्रकार झाला तसाच "अन्याय" आणि पक्षाचे तिकीट कापणे  हा प्रकार  घडणार नसे? आपणास जनतेची सहानुभूती  मिळणार का ??? काँगेस पक्षाचे तिकीट असेल तर कार्यकर्तेही लागतातच.जर कार्यकर्ते नसतील तर लढाई कशी करणार ??? द्विधा मनस्थस्थित ज्याप्रमाणे महाभारतात अभिमन्यू  ची अवस्था झाली होती अगदी त्याचप्रमाणे पृथ्वीराज बाबा पाटील यांची आज अवस्था झाली आहे. 

गेले 5 वर्ष सलग  कामं करून, जाहिरातबाजी करून,लायक आणि योग्य उमेदवारांवर असा अन्याय  होणे गैर आणि दुर्दैवी आहे . काँग्रेसमध्ये तिकीट कोणालाही मिळो पक्षाच्या नेत्याचे कामं करणे आणि त्यांना निवडून आणणे गरजेचे आहे . 

आतापर्यंत गेली 10 वर्ष काँग्रेसचे कामं करणाऱ्या पृथ्वीराज पाटील  यांना सांगलीकरांनी एकदा तरी संधी द्यायला हवी.

तात्पर्य सर्व पैलूंवर सांगलीच्या विधानसभेचे पैलू  आज उलगडून ठेवले आहेत पाहूया विधानसभेत काय होतंय ते ! 


 *इकबाल  बाबासाहेब  मुल्ला* 

( *पत्रकार* )

संपादक - सांगली वेध,

संपादक - वेध मीडिया न्यूज,सांगली 

*मोबाईल - 8983587160*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा