Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

गुरुवार, २६ सप्टेंबर, २०२४

*संग्रामनगर येथील श्रीराम कृपा भजनी मंडळाचा नाशिक येथे गीत भगवद्गीता कार्यक्रम संपन्न*

 


*अकलुज ------प्रतिनिधी*

  *केदार लोहकरे*

    *टाइम्स 46 न्युज मराठी

संग्रामनगर-अकलूज (ता.माळशिरस)येथील श्री ब्रह्मचैतन्य श्रीराम मंदिराचे श्रीरामकृपा भजनी मंडळाचा श्रीक्षेत्र नाशिक येथील परमपूज्य श्री नारायण काका ढेकणे महाराज यांचे आश्रमामध्ये गीतभगवद्गीता हा अतिशय सुस्राव्य असा कार्यक्रम संपन्न झाला.ग.दी.मां.च्या गीतरामायणाचे धर्तीवर पुणे येथील डॉ. प्रदीप आगाशे यांनी या गीतभगवद्गीता उपक्रमाची निर्मिती केलेली असून श्रीरामकृपा भजनी मंडळाच्या संस्थापिका परमपूज्य डॉ.मुग्धाताई तांबे यांचे अथक परिश्रमातून या गीतभगवद्गीता कार्यक्रमाचे सुश्राव्य असे गायन करण्यात येत आहे.या गायन सेवेत श्रीरामकृपा भजनी मंडळाच्या हार्मोनियम वादक व गायन विशारद सौ.अमृताताई अडगळे यांची व तबल्यासाठी संगीत विशारद गोपाळ अडगळे यांची भक्कम साथ संगत मिळत आहे.तसेच भजनी मंडळाच्या 30 महिला सदस्यांचा यात सहभागी आहेत. अतिशय श्रवणीय व भावपूर्ण असे या कार्यक्रमाचे सादरीकरण होत आहे.गीता धर्मप्रसारक मंडळाच्या प्रमुख सौ संध्याताई कुलकर्णी,पुणे यांचे सहकार्याने नाशिक येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले होते. कार्यक्रमाचे सांगता कार्यक्रमात सौ.संध्याताई कुलकर्णी यांनी डॉ.मुग्धाताई तांबे,सौ अमृताताई अडगळे,गोपाळ अडगळे व त्यांच्या भजनी मंडळातील सर्व सदस्य महिलांचे विशेष कौतुक करून त्यांना धन्यवाद दिले व असे कार्यक्रम महाराष्ट्रात ठिक ठिकाणी संपन्न झाले पाहिजेत त्यासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य गीता धर्मप्रसारक मंडळाच्या माध्यमातून देण्यात येईल असे मनोगत व्यक्त केले.

परमपूज्य श्री नारायण काका ढेकणे यांच्या आश्रमामार्फत या कार्यक्रमाचे अतिशय उत्तम असे नियोजन करण्यात आलेले होते.

या कार्यक्रमासाठी सुमारे ५०० गीता प्रेमी भाविकांची उपस्थिती होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा