*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो;--9730 867 448*
राष्ट्रीय कृषी विकास योजना सन 2023 - 2024 अंतर्गत संरक्षित शेती मधील अनिल नामदेव निगडे यांचे मौजे - धर्मपुरी येथील गट क्रमांक - 188 मधील 46 x 88 मीटर आकारमानाचे 4088चौरस मीटर फ्लॅट शेडनेट गृह / हाऊस ची तपासणी दिनांक 20 सप्टेंबर 2024 रोजी माननीय श्री बाळासाहेब लांडगे सर उपविभागीय कृषी अधिकारी पंढरपूर यांनी केली तपासणी करत असताना जास्त मूल्य असणाऱ्या व्यापारी पिकाची लागवड करावी व लागवड अगोदर जमीन व पाण्याचे परीक्षण करून घ्यावे व त्याद्वारे एकात्मिक अन्नद्रव्यवस्थापन करण्याचे मार्गदर्शन केले .तपासणी दरम्यान शेडनेट गृहाची उभारणी मार्गदर्शक सूचने प्रमाणे उत्तम दर्जाचे साहित्य वापरून केल्याने समाधान व्यक्त केले . तपासणी दरम्यान तालुका कृषी अधिकारी माळशिरस आबासाहेब रुपनवर यांनी एकात्मिक फलोत्पादन अभियान व राष्ट्रीय कृषी विकास योजना अंतर्गत संरक्षित शेती व घटक व बाबी साठी भरीव अनुदानाची तरतूद असल्याने शेतक ऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन केले .मंडल कृषी अधिकारी सतीश कचरे यांना तपासणी प्रक्षेत्र भेट शेडनेट गृह मध्ये मल्चिंग पेपरवर लागवड करणे वाव असून या बाबीच्या अनुदानासाठी ॲग्री महाडीबीटी वर मल्चिंग पेपर याबाबत साठी अर्ज करण्याचे मार्गदर्शन केले .सदर प्रक्षेत्र भेट तपासणी वेळी लाभार्थी शेतकरी प्रगतशील शेतकरी शेडनेट गृह उभारणी करणारे ठेकेदार धर्मपुरीचे कृषी सहाय्यक नाळे मोरोची कृषी सहाय्यक कर्णे नातेपुते कृषी पर्यवेक्षक पांढरे व श्री साळुंखे यांनी उपस्थिती दर्शविली व तपासणी कामे सहकार्य केले .लाभार्थी शेतकऱ्यांनी शेडनेट ग्रुप ची तपासणी व अनुदान गणती बाबत कृषी विभागाने दिलेल्या शीघ्र प्रतिसाद बाबत आभार व्यक्त केले .




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा