Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शनिवार, २१ सप्टेंबर, २०२४

*महिला वकिलासमोर जज साहेब यांची "अंडरगारमेंट "वर कमेंट :--मुस्लिम भागाचा 'पाकिस्तान 'असा उल्लेख--- सुप्रीम कोर्टाने घेतली गंभीर दखल!*

 


*टाइम्स 45 न्युज मराठी*

 *मो;--9730 867 448

सर्वोच्च न्यायालायाने कर्नाटक हायकोर्टाचे न्यायमूर्ती वेदव्यासचार श्रीशानंद यांनी पाकिस्तान संबंधी वादग्रस्त टिप्पणी केल्यानंतर या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. जस्टिस वेदव्यासचार श्रीशानंद यांनी भाडेकरू आणि घरमालक यांच्यातील वादाच्या सुनावणीदरम्यान बंगळुरू येथील मुस्लीमबहुल भागाला 'पाकिस्तान' असे संबोधले गोते. जस्टिस श्रीशानंद यांनी या दरम्यान महिला वकीलासमोर महिलांविरोधात वक्तव्य देखील केले होते. आता सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणात कर्नाटक हायकोर्टाकडून रिपोर्ट मागवला आहे.


चीफ जस्टिस ऑफ इंडिया डिवाय चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखालील पाच न्यायाधिशांच्या खंडपीठाने सांगिले की संविधानीक कोर्टात न्यायाधिशांच्या कमेंटबद्दल कठोर गाइडलाइन्स तयार करण्याची गरज आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने सांगितले की, सोशल मीडिया कोर्ट रुममधील कार्यवाही मॉनिटर करत आहे. त्यामुळे आपल्याला कोर्ट ऑफ लॉ मध्ये कोणतीही कमेंट करतेवेळी सौजन्य राखावे लागेल. या खंडपीठात जस्टिस एस खन्ना, जस्टिस बीआर गवई, जस्टिस एस कांत आणि जस्टिस एच रॉय यांचा समावेश आहे.


सीजेआय डिवाय चंद्रचूड म्हणाले की, कर्नाटक हायकोर्टाचे जस्टिस वेदव्यासचार श्रीशानंद यांची कमेंट चर्चेत आहे. त्यांचा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत आहे. कोर्टामध्ये न्यायाधीशांकडून केल्या जाणाऱ्या कमेंट्सवर काही गाईडलाइन्स असणे आवश्यक आहे. या बद्दल कर्नाटक हायकोर्ट धोन दिवसाच्या आत रिपोर्ट फाइल करावा. दरम्यान या प्रकरणाची सुनावणी आता बुधवारी २५ सप्टेंबर रोजी होणार आहे.


सोशल मीडियावर व्हाययरल ङोत अशलेल्या व्हिडीओमध्ये जस्टिस वेदव्यासचार श्रीशानंद बंगळुरू येथील मुस्लीम बहुल भागाला पाकिस्तान संबोधताना दिसत आहेत. तर दुसऱ्या व्हिडीओमध्ये एक महिला वकिलाबद्दल ते आक्षेपार्ह कमेंट करताना दिसत आहेत.


मीडिया रिपोर्टनुसार ते महिला वकीलाला म्हणाले की असे वाटते की त्यांना विरोधी पक्षाबद्दल इतकी जास्त माहिती आहे की कदाचित त्या त्यांच्या अंडरगार्मेंट्सचा रंग देखील सांगू शकतात.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा