Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

मंगळवार, २४ सप्टेंबर, २०२४

*सांगली महापालिका आणि आयुक्तांची गांधारी ची भूमिका संशयास्पद*


 

*इक्बाल  बाबासाहेब मुल्ला*

  *सांगली -----पञकार*

   *मो;--8983 587 160*

सांगली महापालिका आणि आयुक्त हे महापालिका क्षेत्रातील एखादे लहान बालक  मृत्युमुखी पडल्यावरच "जागे" होणार का ???  गेल्या एक वर्षांपासून किमान 50 मुलांवर पिसाळलेल्या कुत्र्यांनी हल्ला  केला, कित्येक मुलांना पिसाळलेल्या कुत्र्यांनी जखमी  केले, सांगली मधील "सिव्हिल हॉस्पिटल" मध्ये कित्येक लोकांना "रेबीज" चा तुटवडयामुळे "लस"  मिळत नाही , महापालिकेची डॉगव्हॅन गायब असते ,त्यांच्या कर्मचाऱ्यांचा मोबाईल  नंबर नसतो आणि लहान मुलांना कुत्री चावल्यानंतर महापालिकेच्या नावाने "शिव्यांची" लाखोली वाहणाऱ्या जनतेची "गाऱ्हाणी"  कोण ऐकणार ???        

       कुत्र्यांपासून संरक्षण कोण करणार ?? सांगलीच्या जनतेला "न्याय" कोण देणार ?? सांगलीतील जनतेचा कोण "वाली" आहे का ?? आयुक्त आणि महापालिका यांची गांधारीची भूमिका एखाद्याचा जीव गेल्यावरच "*जागी*  होणार का ??? सांगलीचे



         खासदार आणि आमदार

 यांनी या ज्वलंत प्रश्नी ,कुत्र्यांपासून सुटका करण्यासाठी कोणते प्रयत्न केले आहेत ?? का आता लोकसभेत आणि विधानसभेत यासाठी "आवाज" उठवला जाणार का ??? 

       आमदार गाडगीळ यांच्या निवासस्थानी कुत्र्यांची "मंदियाळी" !

सांगलीचे कार्यसम्राट माजी आमदार सुधीर गाडगीळ   यांच्या राजवाडा परिसरातील निवासस्थानासमो  व "बदाम चौक" परिसरात सकाळी किमान 10-15 कुत्री  थांबलेली असतात. ग .रा.पुरोहित शाळा  जवळ असताना , आणि शालेय मुली अक्षरशः जीव "मुठीत" घेऊन शाळेत जातं असताना ,आमदार गाडगीळ यांनी आतापर्यंत कुत्र्यांच्या बंदोबस्तासाठी  कोणते प्रयत्न  केले आहेत ?? गाडगीळ यांना त्यांच्या निवासस्थानजवळ असणारी कुत्री पकडण्यास सांगणे म्हणजे सूर्याला  प्रकाश दाखवणारे ठरत नाही का ???

           कुत्र्यांचा कायमचा "बंदोबस्त" करण्याची जबाबदारी कोणाची आहे ???

          शहर उपनगरात कुत्र्यांचा धुमाकूळ !                        

          सांगली आणि विस्तारित उपनगरात पसरलेल्या लोकसंख्येच्या तुलनेत हजारो कुत्री  असताना संपूर्ण महापालिका क्षेत्रासाठी अर्थात  3 लाख लोकांसाठी दोनच डॉग व्हॅन असणे "हास्यास्पद"  आणि संतापजनक आहे. सांगली महापालिकेसाठी वास्तविक किमान 5 ते 10  डॉग व्हॅन ची गरज असताना डॉग व्हॅन ची संख्या 2 असणे सांगली महापालिकेला "शोभणारे" नाही. 

शामरावनगर, हनुमाननगर ,बदाम चौक,पत्रकारनगर ,एस.टी.स्टॅन्ड परिसर, संजोग कॉलनी, सिव्हिल हॉस्पिटल परिसर, राममंदिर चौक, शिंदे मळा,संजयनगर,पंचशीलनगर, रेपे प्लॉट आणि मिरज -कुपवाड येथेही कुत्र्यांनी "हैदोस"  घातला आहे.

लहान मुले- प्रौढ आणि शेळीची पिले  हें  त्यांचे "लक्ष्य आहेत.

कुत्र्यांनी सांगलीतील  रेपे प्लॉट येथे शेळीच्या 3 पिलांना उचलून नेत त्यांचा "फडशा" पाडला.त्याशिवाय कुत्र्यांचे प्रत्येक आठवड्यात एका लहान मुलावर "हल्ले" सुरु आहेत. 

      नसबंदी चा फार्स !

वास्तविक कुत्र्यांना अर्थात मादी कुत्रीला दोनवेळा नसबंदी केल्यावर मादा गरोदर राहत नाही. परंतु "भ्रष्ट कारभार"  आणि "मलई" खाण्याच्या प्रवृत्तीमुळे कुत्र्यांना नसबंदी करणाऱ्या ठेकेदाराकडून फक्त एकदा नसबंदी केली जाते असे समजते. एकदा नसबंदी केल्यावर मादा 6 महिन्यानंतर पून्हा गरोदर होते. आणि पिलांना जन्म देते. जर 2 वेळेला  6 - 6 महिन्यांनी मादाची 'काटेकोर" नसबंदी केल्यास मादा गरोदर राहणार नाही आणि कुत्र्यांची पैदास रोखली जाईल. 



        बिबट्या शहरात येतात म्हणून कुत्र्यांना "जंगलात"  सोडणे हा पर्याय होऊ शकतो का ??  जंगलात "माणसाने" शिरकाव केल्यानंतर जंगलातील  हिंस श्वापदे अर्थात बिबटया - वाघ- चित्ता हें अन्नाच्या शोधात  शहरात ,मानवी वस्तीत येत आहेत. जर कुत्र्यांना आपण जंगलात सोडले तर बिबटया व अन्य जंगली प्राणी कुत्र्यांची "शिकार"  करतील का ?? असे केल्यास कुत्र्यांची संख्याही  कायमस्वरूपी "नियंत्रणात" येईल. आणि अशाप्रकारे कुत्र्यांना जंगलात सोडल्यास जंगली प्राणी मानवी वस्तीत येण्यास आळा बसेल.

सर्वसाधारणपणे जनतेला कुत्र्यांच्या या "त्रासापासून बचाव व्हावा या उदात्त दृष्टीकोनातून हा "लेख"  लिहिला आहे.  

कर्तृत्वसंपन्न महापालिका आयुक्त कडक उपाययोजना करून, डॉगव्हॅन ची संख्या वाढवतील ,त्याशिवाय मुंबई - पूण्यात ज्यापद्धतीने कुत्री पकडण्यासाठी अत्याधुनिक पद्धत अवलंबली जाते,ती पद्धत अवलंबत सांगलीकरांचे "आशीर्वाद" घेतील ही अपेक्षा आहे.


*इकबाल  बाबासाहेब मुल्ला* 

( *पत्रकार* )

संपादक - सांगली वेध 

संपादक - वेध मीडिया न्यूज,सांगली.

*मोबाईल - 8983587160*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा