Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

बुधवार, ४ सप्टेंबर, २०२४

*मिरज पंढरपूर रेल्वे मार्गावरील वासुद रेल्वे स्थानकावर मूलभूत सुविधा पुरवणे बाबत विभागीय रेल्वे प्रबंधकास ,खासदार-- "धैर्यशील मोहिते पाटील" यांचे निवेदन*


 

विशेष ----प्रतिनिधी

  एहसान  मुलाणी

 टाइम्स 45 न्युज मराठी

   मो--9096 837 451

पंढरपूर मिरज मार्गावर असलेल्या वासुद रेल्वे स्थानकावर मूलभूत सुविधा पुरविणेबाबत माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी सोलापूर येथील विभागीय रेल्वे प्रबंधक यांना निवेदनाद्वारे मागणी केली असून याबाबत सविस्तर मागणी पुढील प्रमाणे


मिरज-पंढरपूर रेल्वे मार्गावर असलेल्या वासुद रेल्वे स्थानकावरून पंढरपूर-सांगोला, मिरजेकडे जाण्यासाठी विद्यार्थी शाळेत जातात. याशिवाय या स्थानकातून मिरज, पंढरपूरच्या दिशेनेही रुग्ण उपचारासाठी जातात. एवढेच नाही तर या स्थानकावरून मोठ्या संख्येने प्रवासीही जातात. वासुद रेल्वे स्थान‌काकडे जाणाऱ्या रस्त्यालगत काटेरी झाडे वाढली आहेत. या स्थानकावर दिवाबत्तीची सोय नसल्याने प्रवाशांना व विद्यार्थ्यांना त्रास होत आहे. याठिकाणी मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात तसेच रेल्वे स्थानक परिसर व सत्याच्या कडेला असलेली काटेरी झाडे हटवावीत, अशी प्रवासी जनतेची जनतेची मा मागणी आहे. या स्थानकावर प्रकाशाची सोय होती, मात्र आता ती बंद करण्यात आली आहे.



याशिवाय या स्थानकाच्या दिशेने रेल्वे रुळाच्या पूर्वेकडून प्रवाशांसाठी मार्ग तयार करण्यात आला आहे, मात्र या मार्गाच्या बाजूला काटेरी झाडे वाढली आहेत. त्यामुळे या मार्गावरून जाणे कठीण झाले आहे. या मार्गावरून मोटारसायकलही नेता येत नाही. एवढेच नाही तर या स्थानकाच्या आवारात मोठ्या प्रमाणात काटेरी झाडे आली आहेत. याशिवाय गवतही मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्यामुळे सरपटणारे प्राणी मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. हे प्राणी विद्यार्थी आणि प्रवाशांना त्रास देत आहेत. या भागात दिवाबत्तीची सुविधा नसल्याने रात्री येणाऱ्या प्रवाशांना अंधारातच ट्रेनमधून उतरावे लागते. काटेरी झाडांमधून जावे लागते. त्यामुळे रस्त्याच्या कडेला असलेली काटेरी झाडे व आवारातील गवत हटवून पुरेशी प्रकाश व्यवस्था करण्यात यावी, अशी प्रवासी नागरिकांची मागणी आहे. आपणास विनंती आहे की वासुद रेल्वे स्थानकावर मुलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात व प्रवाशांच्या समस्या सोडवाव्यात इत्यादी मागण्या निवेदनात म्हटले आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा