Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

बुधवार, ४ सप्टेंबर, २०२४

*सांगली येथे C N G गॅस चा खेळ खंडोबा पालिका क्षेत्रात 1000 चाकी गाड्यांचे हाल एकमेव पंप समडोळी फाट्यावर....*


 

*सांगली---पञकार*

 *इक्बाल  बाबासाहेब मुल्ला*

  *8983 587 160*

सी .एन.जी.गॅस भरण्यासाठी दिवसातील एक तास वाया!

महापालिका क्षेत्रात  CNG गॅस भरणाऱ्या तब्बल 1000 चारचाकी असताना,आणि किमान 5 गॅस पंप  आवश्यक असताना , आतापर्यंत  केवळ  कर्नाळ रोडवर  वसंत पेट्रोलियम हा एकमेव  C.N.G.(सी.एन.जी.) पंप सुरु होता तथापि कर्नाळ रोडवर पुराचे पाणी आल्याने तो C.N.G पंप गेले  "महिनाभर "बंद असल्याने गॅस भरण्यासाठी सांगलीतून समडोळी फाट्यावर दररोज ये - जा करावे लागत असल्याने चारचाकी वाहनधारकांचे प्रचंड हाल  होत आहेत. वाहनचालकांचा हा खेळखंडोबा चारचाकी वाहनचालकांच्या संतापाचा पार  वाढवणारा आणि मानसिक त्रास देणारा ठरत आहे.


 *जिल्हाधिकारी कार्यालय तसेच प्रशासनातील चारचाकी गाडयांना फटका*


सांगली जिल्ह्यातील सुमारे 1000 चारचाकी  वाहनचालकांना सांगलीतून सांगलवाडी मार्गे समडोळी फाट्यावर जाणाऱ्या "राजेश्वरी पेट्रोल पंपात"  गॅस भरण्यासाठी 4 किलोमीटर  दूर जावे लागते. वाहनचालकांची ही फरफट भारत  पेट्रोलियम  च्या स्थानिक "अधिकाऱ्यांना" दिसतं नाही का ?? जिल्हाधिकारी तसेच प्रशासनातील कित्येक गाड्या या सी.एन.जी. वर आहेत परंतु त्यांच्याकडून देखील या प्रकाराची "वाच्यता"  का करण्यात येत नाही??? चारचाकी, रिक्षा,तसेच मोठया अवजड गाड्या या CNG  वर चालतात. या सर्वांना दररोज हा त्रास का ??? 

CNG साठी प्रामुख्याने सांगलीतून - हजारो गाड्या येत असल्याने दररोज 2000 किलो गॅस "समडोळी फाट्यातील"  पेट्रोल पंपातून तात्काळ संपत आहे. परंतु सांगलीतील स्थानिक असणारा कर्नाळ रोड वरील मधील  C.N.G.गॅस अजूनदेखील का सुरु नाही ??? अतिशय गंभीर विषयात कुठल्याही वर्तमानपत्रात अथवा सोशल मीडियात देखील चर्चा नाही असे का ?? 

तोंड दाबून बुक्क्याचा मार खाणे ..याची सवय लागलेली आहे का ??? कारण माझ्यासारख्या एका पत्रकाराला 4 दिवसातुन एकदा या पेट्रोल पंपात गॅस भरण्यासाठी जावे लागत असेल तर सांगली जिल्ह्यात  तसेच महापालिका क्षेत्रात  बाहेरगावाहून येणाऱ्या वाहनचालकांना किती त्रास होत असेल ??? 



सांगली -मिरज रोडवर असणाऱ्या पेट्रोल पंपात C.N.G.गॅस क्वचित मिळतो.परंतु ते पेट्रोल पंप गेल्या 1 महिन्यापासून बंद आहे. या पंपावर गॅस भरण्यासाठी कधीही गेला तर CNG.संपला आहे हा बोर्ड आपणास पाहावयास मिळेल. 

 इंडियन ऑइल व अन्य कंपन्यांना CNG भरण्याची परवानगी द्यावी !

महाराष्ट्रात तसेच सांगली जिल्ह्यात "भारत पेट्रोलियम" चे मोजकेच  पंप असताना केंद्रसरकारने केवळ भारत पेट्रोलियम  ला CNG गॅस भरण्याची परवानगी दिली आली आहे.

वास्तविक इंडियन ऑइल तसेच इतर कंपन्यांचे पंप मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळे सरकारने  इंडियन ऑइल तसेच इतर कंपन्यांना   देखील गॅस भरण्याची परवानगी द्यावी. जेणेकरून अत्यंत कमी पंप असणाऱ्या भारत पेट्रोलियम चा भार  कमी होईल आणि  दुसऱ्या इंडियन ऑइल  सारख्या जास्त पेट्रोल पंप असणाऱ्या पंपावर देखील C.N.G उपलब्ध होईल. याचा फायदा सर्व चारचाकी वाहनधारकांना होईल. सांगलीत केवळ 2 CNG पंप असल्याने 1 -1 तास  वाहनचालकांना  गॅससाठी रांगेत  थांबावे लागते. जर CNG पंप जास्त असतील तर वाहनचालकांचा वेळ आणि त्रास  देखील वाचेल.

"भारत सरकारने"  तात्काळ सांगलीमध्ये इतर कंपन्यांना परवानगी  देत  किमान 5 गॅस पंप नव्याने सुरु करून वाहनचालकांची ससेहोलपट थांबवावी ही विनंती !      

 

. *इकबाल  बाबासाहेब  मुल्ला* 

( *पत्रकार* )

संपादक - सांगली वेध

संपादक - वेध मीडिया न्यूज,सांगली.

*मोबाईल - 8983587160*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा