*विशेष ----प्रतिनिधी*
*एहसान मुलाणी*
*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो--9096 837 451*
राष्ट्रीय अध्यक्ष माजी खासदार प्राध्यापक जोगेंद्र कवाडे सर व राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदिपभाई कवाडे यांच्या पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या माळशिरस तालुक्यातील काही नूतन पदाधिकाऱ्यांच्या निवडी महाराष्ट्र युवक प्रदेशाध्यक्ष सोमनाथ भोसले यांच्या हस्ते करण्यात आल्या.
शासकीय विश्रामगृह अकलूज येथे शनिवार 14 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी अकरा वाजता या निवडीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी माळशिरस तालुका कायदेशीर सल्लागारपदी ॲड प्रदीप कदम यांची तर फादर बॉडीच्या तालुका सचिवपदी सिद्धेश्वर ढावरे यांची व युवक सचिवपदी सुजित गायकवाड यांच्या निवडी महाराष्ट्र युवक प्रदेशाध्यक्ष सोमनाथ भोसले यांच्या हस्ते करून निवडीचे पत्र देऊन करण्यात आली.
यावेळी पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे माळशिरस तालुका अध्यक्ष हेमंत कांबळे युवक तालुका अध्यक्ष सचिन मोरे अकलूज शहराध्यक्ष शिवाजी खडतरे महिला आघाडी अध्यक्ष जयश्री गायकवाड तालुका उपाध्यक्ष पांडुरंग चव्हाण तालुका संपर्कप्रमुख रोहिदास तोरणे तालुका सरचिटणीस दयानंद कांबळे तालुका युवक कार्याध्यक्ष शिवम गायकवाड युवक तालुका सरचिटणीस तुषार केंगार तालुका युवक प्रसिद्धीप्रमुख संदीप तोरणे सहप्रसिद्धीप्रमुख योगेश ढावरे आकाश गायकवाड यांचेसह पदाधिकारी यावेळी उपस्थित होते




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा