Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

सोमवार, २३ सप्टेंबर, २०२४

तुळजापूर येथील वासुदेव गल्लीत पावसाचे पाणी शिरल्याने गोरगरिबांचे नुकसान ,विकासाच्या बाता मारणारे आहेत कोठे?---अमोल जाधव (शिवसैनिक)


 

*टाइम्स 45 न्युज मराठी*

 *मो;--9730 867 448*

तुळजापूर येथील वासुदेव गल्ली मध्ये काल झालेल्या संंततधार पावसामुळे  गोरगरिबाच्या घरात पाणी शिरले  तेथे माजी नगराध्यक्ष माजी उपनगराध्यक्ष वीस वर्ष झाले  नगरसेवक तालुक्याच्या नेते हे सर्वच जण   सत्ता भोगत आहेत काही झाले की पत्रकार परिषद घेऊन दुसऱ्यावर आरोप करुन तोंडासुख घेणारे नागरिकांची दिशाभूल करण्याची एकमेव काम करत आहे नगरसेवकांच्या  वार्डात प्रत्येक पावसात गोरगरिबाच्या घरात पाणी शिरते  आणि अन्नधान्य जीवनावश्यक वस्तू ह्या पावसाच्या पाण्याने भिजवून जातात त्यामुळे हातावर पोट भरणारे नागरिकांच्या प्रापंचिक वस्तूंचा घरात पाणी शिरल्याने नुकसान होत असेल तरी नेत्यांनी वार्डाचा विकास न करता सर्व भकास करून ठेवले आहे तरी प्रशासनाने याकडे लक्ष देऊन गोरगरिबाला न्याय द्यावा अनेकदा निवेदन देऊन सुद्धा काही उपयोग नाही नगरपालिका प्रशासन फक्त आश्वासनाची खैरात करते आणि निवेदनाला केराची टोपली दाखवली जाते जेथे विकासाची गरज आहे तेथे विकास होत नाही जेथे विकासाची गरज नाही तेथे विकास होतो तो फक्त आणि फक्त गुत्तेदार, ठेकेदार व त्यांचे कार्यकर्ते जगले पाहिजेत यासाठीच ?

  

         * एकनिष्ठ शिवसैनिक -अमोल जाधव तुळजापूर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा