Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

सोमवार, २३ सप्टेंबर, २०२४

*तुळजापूर येथील तुळजाभवानी संस्थांचे धार्मिक व्यवस्थापकाने पदाचा गैरवापर केल्याने त्याच्यावर कारवाई ची मागणी*


 

*टाइम्स 45 न्युज मराठी*

 *मो;--9730 867 448*

" तुळजापूर येथे कार्यरत असलेले धार्मिक व्यवस्थापक यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून प्रचंड गैरव्यवहार केला असून त्याची चौकशी करून त्याला पदावरून कार्यमुक्त करून फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी अमोल शिवाजी जाधव आणि सागर कुमार इंगळे यांनी तहसीलदार तथा व्यवस्थापक तुळजाभवानी मंदिर संस्थान यांना निवेदनाद्वारे केली असून त्याबाबत सविस्तर वृत्त असे की,                  



      श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान तुळजापूर येथील कार्यरत असलेले धार्मिक व्यवस्थापक श्री. सिध्देश्वर सुग्रीव इंतुले यांनी त्यांच्या पदाचा गैरवापर करुन गोरगरीब शेतकऱ्यांची मुले कामावर असताना त्यांना कामावरुन कमी करुन, BVG कंपनीची नोकरी करीता १८ ते ३५ या वयाची अट असताना मुलांना कमी करुन त्यांचे वडील जे ४० ते ४५ वर्षाचे असताना BVG कंपनी व धार्मिक व्यवस्थाप इंतुले यांनी संगणमत करुन प्रचंड गैरव्यवहार केलेला आहे. पदाचा गैरवापर करुन त्यांनी स्वताचा बाप (वडील) श्री. सुग्रीव इंतुले यांना कामावर घेवुन मंदिराचे नियम मोडीत काडुन मनमानी कारभार करीत आहेत. पदाचा गैरवापर केल्यामुळे त्यांना त्यांच्या पदावरुन कार्यमुक्त करुन त्यांच्या परिवाराचा पूर्ण आर्थिक व्यवहार याची चौकरी करुन त्यांच्यावर फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्यात यावेत,


तसेच BVG चे सिक्युरिटीचे सुपरवाईजर श्री. सचिन शिवाजी पवार यांच्या आई सौ. जयश्री शिवाजी पवार वय ५० ते ५५ वर्षे, पत्नी- पुजा सचिन पवार या दोघींना बेकायदेशीर रित्या कामावर घेवुन तसेच त्यांनी मंदिर संस्थान येथे कामावर न येता त्यांची बोगस हजेरी लावुन त्यांच्या नावे रक्कम उचलुन मंदिर संस्थानची आर्थिक फसवणुक केलेली आहे. त्याबाबत चौकशी होणे अवश्यक असुन संबंधीतावर योग्यती कायदेशीर कारवाई करण्यात यावी व अपराहारीत रकक्म वसुल करण्यात यावी.


तसेच BVG कंपनीचे श्री. बाळु बागल व भरत येवले यांनी संगणमत करुन तुळभवानी मंदिर व कंपनीस फसवणु लाखो रुपयाचा अपहार केलेला आहे. त्यांचीही चौकशी करुन त्यांच्यावर गुन्हा नोंद करुन अपहारीत रक्कम वसुल करण्यात यावी.


तरी आपण याबाबत लवकरात लवकर निर्णय घेवुन संबंधीताची चौकशी लावुन त्यांच्यावर गुन्हे नोंद करुन अपराहाती रक्कम वसुल करण्यात यावी अन्यथा दिनांक २६/०९/२०२४ रोजी मंदिर संस्थान कार्यालयास ठाळे ठोकुन आंदोलन करण्यात येईल  असा इशारा--1)अमोल शिवाजीराव जाधव   2)सागर कुमार इंगळे -रा.ता.तुळजापूर  यांनी निवेदनाद्ववारे देण्यात आला आहे.


सोबतः- पुरावा म्हणुन ४ फोटो प्रती जोडलेल्या आहेत.


निवेदक ---श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान, तुळजापूर (मध्यवर्ती प्रशासन कार्यालय आवक विभाग)


दिनांक :- 23/09/24


माहीतीस्तव व योग्यत्या कार्यवाहीस्तव :-


१. मा. जिल्हाधिकारी साहेब धाराशिव तथा अध्यक्ष श्री. तु.भ.मं.सं. तुळजापूर.


२. मा. श्री. ओमप्रकाश राजे निंबाळकर, खासदार धाराशिव.


३. मा. पोलीस निरीक्षक साहेब, पोलीस स्टेशन तुळजापूर.

   यांना सादर करण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा