Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

बुधवार, २५ सप्टेंबर, २०२४

*तुळजापूर येथील आठवडी बाजार पूर्वीप्रमाणे मंगळवारी सुरू ठेवावा --खासदार,ओमराजे निंबाळकर यांची मागणी*


 

*टाइम्स 45 न्युज मराठी*

 *मो;--9730 867 448*

तुळजापुर येथील आठवडी बाजार पुर्वीप्रमाणे मंगळवारी सुरु ठेवावा अशी मागणी धाराशिव चे खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांनी धाराशिव चे जिल्हाधिकाऱ्यां कडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे

याबाबत सविस्तर मागणी अशी की

गेली, अनेक वर्षापासून तुळजापुर येथे मंगळवारी आठवडी बाजार भरवला जात होता. परंतू काही कारणास्तव सदर आठवडी बाजार बुधवारी भरवला जाणार असल्याचे समजते. मंगळवार व शुक्रवार हे दोन दिवस मोठ्या प्रमाणात भावीक भक्त तुळजापुर येथे दर्शनासाठी येतात. यामुळे शेतकरी व व्यापारी यांना या गोष्टीचा व्यावसायीक लाभ होत होता. शेतकऱ्यांच्या शेतमाल विक्रीवरती व सर्व व्यापारांच्या व्यावसायावरती परीणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पुर्वीप्रमाणे तुळजापुर येथील आठवडी बाजार मंगळवारी सुरु ठेवणेबाबत शेतकरी व व्यापाऱ्यांकडून मागणी करण्यात आली आहे. त्या

अनुषंगाने आपल्या स्तरावरुन योग्य ती कार्यवाही करावी. असेही निवेदनात म्हटले आहे



(ओमप्रकाश भुपालसिंह उर्फ पवन राजेनिंबाळकर)


माहितीस्तव प्रत :- मुख्याधिकारी, नगरपरिषद तुळजापूर यांना सादर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा