*इक्बाल बाबासाहेब मुल्ला*
*सांगली -----पञकार*
*मो;--8983 587 160*
रिव्हॉल्व्हर "लॉक" असताना, हातात *बेड्या* असताना "क्रूरकर्मा" अक्षय शिंदे याने स.पो.निरीक्षक मोरे यांचे सर्व्हिस रिव्हाल्व्हर कसे हिसकावले ..? त्याशिवाय आत्तापर्यन्त कधीही रिव्हॉल्व्हर न "पाहणारा" , त्याला "हात" देखील न लावणारा अक्षय शिंदे याने ते चालवण्याचे प्रशिक्षण कधीच घेतले नव्हते, ज्याला कधी गोळी कशी झाडावी हें ज्ञान नव्हते ती व्यक्ती एखाद्या पोलिसांवर गोळी झाडू शकतो का ??? मग अक्षय शिंदेचा खून की हत्या ???
अक्षय शिंदेच्या हत्येचा फायदा कोणाला ??
अक्षय शिंदेच्या हत्येचा कुणाला फायदा होणार आहे ??राजकीय नेत्यांना की संस्थाचालकांना ?? कारण आत्तापर्यंत संस्थाचालक फरार आहेत, त्यांच्यावर कुणाचा वरदहस्त आहे ?? त्यांचा "गॉडफादर" कोण ?? आज अक्षय शिंदे याच्या मृत्यू नंतर उच्च न्यायालयात त्या आपटे आणि अन्य पदाधिकाऱ्यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे. वास्तविक खालील कोर्टात पॉक्सो कायद्याअंतर्गत जामीन मिळाला नसताना उच्च न्यायालयात ते अर्ज करतात आणि ते ही अक्षय शिंदे च्या एन्काउंटर नंतर ..! "संशय" घेण्यासारखे कित्येक पुरावे उपलब्ध असताना , गृहखात्याला आत्तापर्यंत आपटे का मिळू शकत नाही ?? का त्याला अटक करण्याची "इच्छाशक्ती" नाही ??? त्याशिवाय सी.सी.टी.व्ही*.फुटेज डिलीट करणारा कर्मचारी ही त्यादिवसापासून गायब आहे. तात्पर्य हें फार मोठे षडयंत्र मोठ्या माशांना वाचवण्यासाठी रचले आहे. त्याचा "पर्दाफाश" व्हायलाच हवा.
दुसरा मुद्दा हा की , छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पाडणारा पण "आपटे" ! त्याशिवाय क्रूरकर्मा अक्षय शिंदे ज्या शाळेत कामं करत होता त्या शाळेचे संस्थाचालक पण आपटे.! आज दोघेही "फरार" आहेत. मृत ..त्याचे नावं अक्षय शिंदे, मारणारा पोलीस अधिकारी संजय शिंदे , आणि सत्ताधाऱ्यांचे नावं देखील शिंदेचं ! काय योगायोग आहे हा ???
नराधम अक्षय याला फाशीची शिक्षा व्हायला हवी होती.जे कामं न्यायालयाचे आहे ते कामं जर पोलीस करत असतील तर "सर्वसामान्य" जनतेचा कधीही बळी जाऊ शकत नाही का ??? मनात आले त्याला "उडवले" असे न होता कायदा हातात न घेता त्या गुन्हेगाराला "शासन" व्हायला हवे.
भाजपा आज "बॅकफूट" वर आहे. भविष्यात भाजपचे पानिपत रोखण्यासाठी , त्याची बदनामी रोखण्यासाठी अक्षय शिंदे याचे एन्काउंटर केले नसेल ना ?? आज महायुती सरकार भविष्यात सत्तेपर्यंत जाईल याची "श्वाश्वती" नाही. त्यामुळे ज्या बदलापूर मतदार संघात,ज्या शाळेत दोन मुलींवर अत्याचार झाले त्या मतदारसंघात जनतेला न्याय दिला हें भासवण्यासाठी तर हा सर्व "बनाव" रचला गेला नसेल ना ?? त्याशिवाय अत्याचार झालेल्या मुलीचे प्रकरण बाहेर आल्यानंतर शाळेतील एक "मोठी मुलगी" गायब झाली आहे ,असे काहींचे म्हणणे आहे . तिचा काहीच "ठावठिकाणा" मिळाला नाही . पोलिसांनी या प्रकरणाचा "प्रामाणिकपणे" तपास केला आहे का ??? हाच खरा प्रश्न आहे. बदलापूर मध्ये काल फटाके फोडले गेले आणि पेठे वाटले गेले. आणि याच बदलापूर मतदारसंघात 2 मतदारसंघ आहेत. खऱ्या आरोपीला वाचवण्यासाठी, खोटा " मुखवटा" घालून "सत्य" लपवण्याचा हा "डाव" नाही ना ??? त्याशिवाय भाजपचा कमी झालेला जनाधार आणि प्रसिद्धी यामुळे लोकांना "खुश" करण्याचे डावपेच एका आरोपीला "गोळी" घालून पूर्ण केले जातं नाहीत ना ???
वादग्रस्त पोलीस अधिकारी संजय शिंदेचं "पोलीस व्हॅन" मध्ये कसा ???
ज्याने काही वर्षांपूर्वी आपल्या सहकारी पोलीस अधिकाऱ्यावर गोळी झाडली होती त्या पोलीस अधिकारी संजय शिंदे याची पाश्वभूमी ही भयानक आहे. अबू सालेम आणि छोटा शकील यांच्या सोबत त्याचे तथाकथित "कनेक्शन" संशयाच्या भोवऱ्यात होते,असे समजते. अशा वादग्रस्त अधिकाऱ्याला पोलीस व्हॅन मध्ये का घेतले ??? अक्षय शिंदे याला तोंडावर रुमाल का घातला नाही ?? त्याला बेड्या का ठोकल्या नाहीत ?? रिव्हॉल्व्हर मध्ये लॉक का लावला नव्हता ?? जर अक्षय ने गोळी झाडली तेंव्हा पोलिसांनी कमरेखाली गोळी का झाडली नाही ??? पोलिसांनी अक्षय ला शरीराच्या कोणत्या जागी गोळी झाडली ??? अक्षयला गोळी डोक्यात मधोमध का झाडली ???
त्याशिवाय ,पोलिसांनी संजय शिंदे यांनी गोळी झाडली हें सांगण्यासाठी गृहखात्याला 4 तास घेण्याचे कारण काय ??? या प्रकरणाला गृहखात्याची प्रेसनोट आत्तापर्यंत का आली नाही ?? या प्रकरणाचा "सी.बी.आय "तर्फे तपास करायलाच हवा.तरच याचा "पर्दाफाश" होईल.
अक्षय चा झालेलं एन्काउंटर वादग्रस्त आणि भयानक आहे.
भविष्यात "राजकीय पोळी" भाजण्यासाठी पोलिसांचा गैरवापर "राजकीय" पुढाऱ्यांकडून टाळला गेला पाहिजे. कायदा - सुव्यवस्था राखण्यासाठी एखाद्याचा "बळी" देणे नैतिकतेच्या कक्षेत बसत नाही. अक्षयला फाशीच झाली असती. परंतु दुसऱ्या खऱ्या आरोपीला वाचवण्यासाठी एन्काउंटर करणे म्हणजे म्हातारी मेल्याचे दुःख नाही ..पण काळ सोकावता कामा नये ,हा यातून अर्थ निघतो.
.*इकबाल बाबासाहेब मुल्ला*
( *पत्रकार* )
संपादक - सांगली वेध,
संपादक - वेध मीडिया न्यूज,सांगली.
*मोबाईल - 8983587160*





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा