Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

बुधवार, २५ सप्टेंबर, २०२४

*येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत सरकार ला मराठा समाज त्याची जागा दाखवेल!..--आनंद काशीद.*


 

*टाइम्स 45 न्युज मराठी*

 *मो;--9730 867 448*

संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांचा अंतरवाली सराटी मधील आमरण उपोषण नवव्या दिवशी स्थगित झाल्यामुळे  बार्शी येथील योध्दा "आनंद काशीद "यांनी देखील उपोषण नवव्या दिवशी स्थगित केले. मागील अनेक वर्षापासून मराठा आरक्षणाचा लढा चालू आहे परंतु संघर्ष होता म्हणून जरांगे पाटील यांनी मागील एक वर्ष भरापासून जे अमरण उपोषण आणि सातत्याने आंदोलने केली आहे त्याला मराठा समाजाने भरभरून प्रतिसाद दिला असताना देखील सरकार मात्र तमासगीर प्रमाणे  आमचा अंत पाहत आहे  माञ तो  मराठ्यांना आरक्षण देऊ शकत नाही ही मात्र खरी खंत मराठा समाजाच्या मनात असल्यामुळे येणाऱ्या विधानसभेला मराठा समाज  सरकार ला त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही अशी भावना  आनंद काशीद यांनी  उपोषण सोडताना  भावना व्यक्त केली, मराठा समाज मागील काळी  सुध्दा मनोज जरांगे पाटलांच्या सोबत होता आणि इथून पुढच्या काळात देखील मनोज जरांगे पाटलांच्या पाठिशी खंबीरपणे उभा आहे त्यांचा आदेश शिरसंवाद म्हणून काम करेल आणि बार्शी तालुका त्यामध्ये आघाडीवर राहील यामध्ये कुठलीही शंका नसल्याचे यावेळी आनंद काशीद यांनी सांगितले. उपोषण सोडण्यासाठी बार्शी तहसीलचे नायब तहसीलदार-" सुभाष बदे "बार्शी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक- बालाजी कुकडे, त्याचबरोबर माजी ,नगराध्यक्ष विश्वास बहू बारबोले, माजी पंचायत समितीसभापती- युवराज बापू काटे ,माजी पंचायत समितीसभापती लक्ष्मण बापू संकपाळ ,माजी उपनगराध्यक्ष- राहुल भैया कोंढारे, यांच्यासह अनेक समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित  होते, यावेळी विनायक मामा घोडके, विजय अण्णा साळुंखे यांनी मनोगत व्यक्त केले यासोबत समाजबांधव मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा