Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

मंगळवार, २४ सप्टेंबर, २०२४

*श्री बंकट स्वामी महाविद्यालयात "राष्ट्रीय सेवा योजना दिन "साजरा*


 

*विशेष ----प्रतिनिधी*

  *एहसान  मुलाणी*

 *टाइम्स 45 न्युज मराठी*

   *मो--9096 837 451*

बीड : विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रभक्ती व समाज सेवेची भावना रुजवण्यासाठी आपल्या देशात 24 सप्टेंबर 1969 रोजी राष्ट्रीय सेवा योजना कार्यान्वित करण्यात आली असल्यामुळे श्री बंकट स्वामी महाविद्यालयात 24 सप्टेंबर हा *दिन राष्ट्रीय सेवा योजना दिन* म्हणून साजरा करण्यात आला. यानिमित्त स्वच्छ भारत अभियान अंतर्गत महाराष्ट्र राज्य प्राचार्य महासंघाचे अध्यक्ष व शंकरराव मोहिते महाविद्यालय ,अकलूजचे माजी प्राचार्य डॉ.आबासाहेब देशमुख यांचे विशेष व्याख्यान  व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी  महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.विवेक मिरगणे हे होते .



प्राचार्य डॉ.आबासाहेब देशमुख यांनी राष्ट्रीय सेवा योजनेचे ध्येय ,उद्दिष्टे व विविध उपक्रमांची माहिती दिली. राष्ट्रीय सेवा योजनेमध्ये मनापासून सहभाग घेऊन काम केल्यास विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व कसे विकसित होऊ शकते याबद्दलची माहिती त्यांनी दिली . महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये  ऊर्जा ठासून भरलेली असते ती त्याला स्वस्थ बसू देत नाही. त्या ऊर्जेला राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून  योग्य दिशा व वळण दिल्यास विद्यार्थ्यांच्या हातून राष्ट्रहिताचे व समाजसेवेचे  काम चांगल्या प्रकारे होऊ शकते आणि जर त्यांच्या ऊर्जेला योग्य दिशा मिळाली नाही तर त्याच्या हातून विध्वंसक काम होऊ शकते,राष्ट्रीय सेवा योजनेमध्ये मनापासून सहभागी झाल्यास समाजसेवेतून शिक्षण होऊन पर्यायाने विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व विकसित होते ,कोणतेही काम करण्याची त्याला लाज वाटत नाही, त्याच्यामध्ये आत्मविश्वास वाढतो, कौशल्य विकसित होते ,नेतृत्व गुण निर्माण होतात ,समाजासाठी ,राष्ट्रासाठी काहीतरी चांगले केले पाहिजे ही भावना त्याच्यामध्ये निर्माण होते, प्रत्येक राष्ट्रीय व सामाजिक कार्यात तो स्वयंस्फूर्त पुढाकार घेतो, व्यसनापासून व कुसंगती पासून दूर राहतो असे अनेक फायदे राष्ट्रीय सेवा योजनेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना होतात तसेच त्यांचे व्यक्तिमत्त्वातील अनेक पैलू विकसित होतात असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. आबासाहेब देशमुख यांनी यावेळी केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा