*अकलुज----प्रतिनिधी*
*केदार लोहकरे*
*टाइम्स 45 न्युज मराठी*
महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभागाच्या वतीने मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजना मोठ्या उत्साहात राबविण्यात आली आहे पण लाडक्या बहिणींच्या खात्यातून बॅंकाने विविध कर कट करून घेतल्यामुळे लाडक्या बहिणींच्या पदरी निराशाच आली आहे.
महिला व बालविकास कल्याण वतीने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची संपुर्ण महाराष्ट्रात मोठ्या जोमात चालू आहे.६५ वर्षाच्या आतील महिलांनी धावपळ करून विविध शासकीय दाखले काढून ऑनलाईन अर्ज केले.काही दिवसात या महिलांच्या बॅंकेच्या खात्यात जमा झाल्याचे मोबाईलवर मेसेज आल्यामुळे महिला वर्ग खूप आनंदी झाल्या होत्या.पण बॅंकेत पैसे काढायला गेल्यावर त्यांच्या खात्यातील रक्कम बॅंकानी विविध करांच्या माध्यमातून रक्कम कट केल्यामुळे लाडक्या बहिणींच्या पदरी निराशाच आली आहे.
लाडक्या बहिणींच्या रक्कमेवर बॅंकांनी त्यांचे कर कापून घेतल्यामुळे मुख्यमंत्रीच्या लाडक्या बहिण योजनाचे आलेली रक्कम तुरळक राहिल्यामुळे ऐन सणासुदीच्या दिवशी बहिणी उपाशी अशी अवस्था अकलूज परिसरातील महिलांची झाली आहे.त्यामुळे महिला वर्गातून या योजनेबद्दल निराश पसरली आहे.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा