*उपसंपादक --नूरजहाँ शेख*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
गौराई समोर आरास करण्यात घरच्या लक्ष्मी व्यस्त
माळशिरस तालुक्यात शहरी भागाबरोबर ग्रामीण भागात गौराईचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.आज दिवसभर गौराई समोर सजावट करण्यात सुहासिनी व्यस्त होत्या.
गणपती आगमननंतर गौराईच्या आगमन घरा घरात झाले असल्यामुळे घरा घरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.त्यामुळे काल दिवसभर ग्रामीण भागातील महिला गौराई समोर सजावट,रांगोळी,फराळाची मांडणी करण्यात व्यस्त होत्या. त्यामुळे घरच्या लक्ष्मीची घाई गडबड झाली होती.त्यामुळे घरच्या लक्ष्मीचा उत्साह द्विगुणित झालेला दिसून येत होता. माळशिरस तालुक्यातील वाघोली या गावातील विष्णू निवृत्ती चव्हाण यांच्या घरी गौराईच्या बाजूला उभ्या घरच्या लक्ष्मी, मधुरी योगेश चव्हाण व प्राजक्ता विकास चव्हाण यांच्या घरातील गौराई शेजारी फोटो काढण्याचा मोह आवरू शकल्या नाहीत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा