*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो;--9730 867 448
सांगली- बुध दि. ११ येथील डॉ नोमान शिरोळकर वय वर्षे 42 (MBBS MD ) हे भूलतज्ज्ञ होते मुंबईतील सैफी सोमैया या नावाजलेल्या हॉस्पिटल मध्ये सेवा दिली तसेच सध्या झिनोवा शालबी या मल्टीस्पेशालिटी या हॉस्पिटल मध्ये प्रत्येक दक्षता विभागात कार्यालयात होते अत्यंत संयमी मनमिळावू स्वभावामुळे ते सर्वांना हवेहवेसे वाटत होते त्यांनी कोरोना काळात मुंबई मध्ये चोख कामगिरी बजावली होती त्यांच्या अनुभव पाहता सांगलीत कोरोनाचा हाहाकार माजला होता त्यावेळी तत्कालीन मा जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना सांगलीत पाचारण केले होते त्यांचा कोरोना नियंत्रण आणण्यात मोलाचं वाटा आहे वैद्यकीय क्षेत्रात आणि समाजाची मोठी हानी झाली आहे मानवता सेवेचा दुत हरपला आहे असे बोलले जात आहे काही दिवस मुंबईतील उपचारानंतर सांगलीत एका खाजगी हॉस्पिटल मध्ये उपचार घेत होते त्यांच्या पश्चात वडिल आई भाऊ पत्नी एक मुलगा एक मुलगी असा परिवार असून ,वडील हाजी इम्तियाज शिरोळकर हे अत्यंत प्रेरणादायी व्यक्तिमत्व आहे सध्या ते वयस्कर आणि विविध आजाराने ग्रस्त असतात घरातील करता आणि तरूण मुलांच्या निधनाने त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे अल्लाह त्यांच्या कुटुंबीयांना सहन (सब) आणि धीर (हिम्मत) देवो हीच सर्व स्तरातून प्रार्थना होत आहे
डॉ नोमान इम्तियाज शिरोळकर
सांगलीतील मुस्लिम समाजाचे कर्तबगार हरहुन्नरी चतुरस्त्र डॉ नोमान शिरोळकर हे हरवल्याने कुटुंबांमध्ये दुःखाचा डोंगर
कोसळला आहे त्यांच्या अकाली निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा